मराठा सेवा संघाच्या वर्धापन दिनानिमित्त प्रबोधनकार केशव ठाकरे यांच्या जंयती निमित्त संभाजी ब्रिगेड यांच्यावतीने सांगवी नं 2 येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पुस्तकाचे वाटप
करमाळा प्रतिनिधी मराठा सेवा संघ 32 वा वर्धापन दिनानिमित्त प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांच्या जंयती निमित्त संभाजी ब्रिगेड यांच्या वतीने सांगवी नं 2 येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला करमाळा तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मनोज राऊत साहेब सौ राऊत मॅडम यांच्या हस्ते या शाळेला सर्व सेमी इंग्रजीची पुस्तके वाटप करण्यात आली करमाळा तालुक्यातील एकमेव शाळा आहे ती सर्व सेमी इंग्रजी झाली आहे. या कार्यक्रमास नितीन खटके साहेब (संभाजी ब्रिगेड पुणे विभागीय अध्यक्ष)सरपंच सौ. शोभा आजिनाथ बनसोडे , सुहास पोळ (संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष करमाळा) ,अतुल निर्मळ (संभाजी ब्रिगेड जेऊर शहराध्यक्ष), रोहिदास दौंड (ग्रामविकास अधिकारी),सुहास शिंदे, वैभव तळे (उपसरपंच) शाळा व्यावस्थापन समिती अध्यक्ष नानासाहेब निंबाळकर उपाध्यक्ष तुळशिदास शिंदे ,
पांडुरंग तळे ग्रा.प.सदस्य,दिनकर तळे ग्र.प.सदस्य अजित तळे शा.व्यवस्थापन .समिती .सदस्य
काकासाहेब निंबाळकर , प्रगतशील बागायतदार रामेश्वर कोरे , चंद्रकांत गवळी , सुहास नागटिळक, अजित कांबळे शिक्षक , शंकर लोणक.र (मुख्याध्यापक) आदीजण उपस्थित होते. गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी केलेल्या आव्हानांना प्रतिसाद देऊन संभाजी ब्रिगेड यांच्या वतीने शाळेला सेमी इंग्रजीची पुस्तके भेट दिली आहेत. प्रत्येक वर्षी शाळा, आश्रमशाळा, गोरगरीब व अनाथ लोकांना महापुरुषांच्या जयंती निमित्त मुलांना गणवेश, वह्या-पुस्तके, महापुरुषांचे फोटो , कोविड काळामध्ये गरीब लोकांना किराणा वाटप अनाथांना कपडे, खाऊवाटप, इत्यादी सामाजिक उपक्रम संभाजी ब्रिगेड यांच्या वतीने प्रत्येक वर्षी राबवले जातात आभार काकासाहेब निंबाळकर यांनी मांडले.
