आ. संजयमामा शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश … कुकडी भूसंपादनासाठी 13 कोटी 50 लाख तर सीना माढा योजनेच्या भूसंपादनासाठी 16 कोटी 65 लाख निधी प्राप्त.
करमाळा प्रतिनिधी
करमाळा विधानसभा मतदार संघाचे आ. संजयमामा शिंदे यांनी जलसंपदामंत्री ना. जयंत पाटील साहेब यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे करमाळा मतदारसंघासाठी तब्बल 30 कोटीहून अधिक निधी प्राप्त झाला असल्याची माहिती आ. संजयमामा शिंदे यांनी दिली.यामध्ये करमाळा तालुक्यातील कुकडी प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या पोफळज, झरे, मोरवड, विहाळ या गावांसाठी 13 कोटी 50 लाख निधी मंजूर झाला असून माढा तालुक्यातील सीना माढा उपसा सिंचन योजनेच्या अंतर्गत येणाऱ्या टेंभुर्णी, कुर्डू या गावातीलभूसंपादनासाठी 16 कोटी 65 लाख 11 हजार 137 रुपयाचा निधी प्राप्त झालेला आहे. आ.संजयमामा शिंदे यांनी आमदार झाल्यानंतर 30 वर्षापासून रखडलेल्या कुकडी भूसंपादनाच्या विषयावरती तसेच दहिगाव व सीना माढा या उपसा सिंचन योजनांच्या भूसंपादनाच्या कामासाठी सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे तालुक्याला भरघोस निधी प्राप्त झालेला आहे. आ. संजयमामा शिंदे यांनी यापूर्वी कुकडीसाठी 20 कोटी तर दहीगावसाठी 7 कोटी असा 27 कोटींचा निधी भूसंपादनाच्या कामासाठी यापूर्वीच मतदारसंघासाठी मिळविलेला आहे. आ.संजयमामा शिंदे यांच्या या कामामुळे मतदार संघातील शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत.
