वाशिंबे येथील शेतकऱ्यांचे शेतीपद्धतीचे काम अनुकरणीय:- भाग्यश्री पाटील
वाशिंबे प्रतिनिधी
वाशिंबे ता. करमाळा येथील शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकाला बगल देत फळबाग लागवडी कडे वळून शेतीमधील केलेले सुक्ष्म नियोजन व बाजारभिमुख शेतीपद्धतीचे काम वाखान्यांजोगे व परिसरातील शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी व अनुकरणीय आहे असे प्रतिपादन वाशिंबे ता करमाळा येथे राजाभाऊ पाटील यांच्या पाटील फार्म हाऊस वर आयोजित शेतकरी मेळावा प्रसंगी रायझ एन शाईन कंपनीच्या विश्वस्त डॉ, डी, वाय पाटील यांच्या कन्या भाग्यश्री पाटील यांनी केले.
यावेळी पाटील यांनी प्रत्यक्ष प्लॉटवर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. येथील केळी बागांना भेटी देऊन बापू झोळ,अमोल भोंग,नितीन पाटील,यांच्या केळी बागांवर जाऊन मार्गदर्शन केले व त्यांच्या शंकांचे निरसन केले.
यावेळी महेंद्र पाटील, शिवाजी बंडगर, शहाजी देशमुख, धनीसाहेब पाटील, हरिभाऊ मंगवडे, तानाजी झोळ, सविता राजे भोसले, भाऊसाहेब झोळ,आदी उपस्थित होते.
