करमाळ्यात घाणीचे साम्राज्य काँग्रेस आक्रमक उपाययोजना न झाल्यास नगरपालिकेसमोर गाळ फेकणार-शहराध्यक्ष सुजय जगताप
करमाळा प्रतिनिधी-करमाळा येथील नगरपालिका प्रशासन दूर्लक्ष करत असल्याने करमाळा शहराची अवस्था बकाल झाली असून पंधरा दिवसांत कारवाई न झाल्यास काँग्रेस पक्षाच्या वतीने नगरपालिकेसमोर गाळ फेकण्यात येईल असे निवेदन काँग्रेस चे युवक शहराध्यक्ष सूजय जगताप यांनी नगरपालीका कार्यालयात मुख्याधिकारी यांना दिले आहे.त्याच्या प्रती मा.पोलिस निरिक्षक व मा.तहशिलदार यांना दिले आहे.
निवेदनात करमाळा शहरास कोणी वाली राहीला नसून जिकडे तिकडे घाणीचे साम्राज्य असून,गटारी तूंबल्या आहेत,कचरा रस्त्यावर येत आहे,घाणीचे ढिग जागोजागी दिसून येतायत त्यामूळे सर्वत्र मच्छर व रोगराई पसरण्यास सुरूवात झाली आहे.काही ठिकाण चे पेव्हिंग ब्लाॅक उचकटून पडले आहेत. त्यात पाणी साचते त्यामुळे चालताही येत नाही.
यावर पंधरा दिवसांच्या आत उपाययोजना न झाल्यास शहरातील घाण नगरपालिकेसमोर आणून टाकली जाईल व यांस करमाळा नगरपालिका जबाबदार राहील असा ईशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.


