बागलांनी राष्ट्रवादी सोडली म्हणून पवारांनी कारखाना अडचणीत आणला- सचिन काळे
आदीनाथ सहकारी साखर कारखान्याच्या कर्ज फाईल , भाडेतत्व , शासन दरबारी मदत होणार असली की ?वाद विवाद का घडवतात ?
” सहकार तत्वावर चालवा किंवा अन्य कोणत्याही तत्वावर पण कारखाना चालू होऊ द्या असे मत युवा सेनेचे मा तालूका प्रमुख सचिन काळे यांनी व्यक्त केले आहे.काळे पुढे बोलताना म्हणाले की आता कारखाना चालू झाला पाहीजे हे माझे व सुजान शेतकऱ्यांचे मत आहे आहे. आदीनाथ कारखाना म्हणजे स्वतच्या प्रसिद्धीचे साधन बनवले आहे..
आमदार रोहीत पवारांनी सुद्धा बारामती ऑग्रोच्या माध्यमातून चालवु म्हणून दोन सिझन वाया घालवले परिनामी कारखाना बंद राहीला व करमाळा तालूक्यातील शेतकऱ्यांच्या ऊसाचा प्रश्न मोठ्या प्रमानात उभा राहीला आहे . शेतकऱ्यांना अडचणीला तोंड द्यावे लागत आहे . यामुळे येत्या काळात रोहीत पवार यांनी कारखान्याच्या संदर्भातले धोरण स्पष्ठ करावे विनाकारन शेतकरी सभासदांच्या भावनेशी खेळू नये असे स्पष्ठ मत शेतकरी व सभासदां मधून होत आहे . बागल कुटुंब २०१९ विधान सभेच्या तोंडावर राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत गेले व शिवसेनेच्या चिन्हावर विधान सभाही लढवली त्यात त्यांचा पराभवही झाला . तूमची राष्ट्रवादी बागलांनी सोडली म्हणून जर आदीनाथ बारामती ॲग्रोच चालवणार असे नादी लाऊ नका तुम्ही बागलांचा राग संस्थेवर काढणार असाल तर ते चुकीचे आहे.
एकतर २०१९ ला बागलांना पाडण्याच्या नादात तालूक्यातील बड्या बड्या नेत्यांनी कारखाना चांगला चालला तर बागल आमदार होतील कारखाना स्थळावर आंदोलन करणे व त्याच्या बातम्या करणे, संचालक फुटलेल्या बातम्या करणे , कामगारांच्या आंदोलनाच्या बातम्या करणे हे सगळे दप्तर तयार करून कर्ज देणाऱ्या बॅकांना ते पाठवणे संस्थेत वादविवाद असल्यामुळे बँकेने अर्थसाय्य केले नाही अशा पध्दतीने संस्था अडचणीत आणली व संस्था बंद पाडली बागलांना विरोध करण्याच्या नादात संस्थेलाच विरोध केला , अन् आमदार रोहीत पवार तुम्ही सुद्धा बागलांना विरोध करण्याच्या नादात आदीनाथ चालू करतो म्हणून दोन सिजन बंद ठेवला असेही सचिन काळे यांनी सांगितले आहे.
