कुंभेज येथे विकासकामांचा भूमिपूजन समारंभ व जाहीर प्रवेश कार्यक्रम संपन्न..
करमाळा प्रतिनिधी
प्रधानमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत राज्यमार्ग 8 ते कुंभेज गुळसडी ( चौगुले वस्ती ) या 6 कि.मी लांब असलेल्या रस्त्याच्या कामाचा भूमिपूजन समारंभ काल दिनांक 29 मार्च रोजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार जयवंतराव जगताप हे होते. या रस्त्यासाठी 4 कोटी निधी मंजूर झाला आहे.
या कामाच्या भूमिपूजन समारंभाचे औचित्य साधून कुंभेज येथील ग्रामपंचायत सदस्यांचा आमदार संजयमामा शिंदे गटामध्ये जाहीर प्रवेश हा कार्यक्रम यावेळी घेण्यात आला.
कुंभेज ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य श्री अण्णासाहेब साळुंखे यांचेसह रनजीत कादगे, बबन कन्हेरे या ग्रामपंचायत सदस्यांसह उद्योजक महावीरशेठ साळुंखे व कुंभेज येथील असंख्य कार्यकर्ते यांनी माजी आमदार नारायण पाटील गटातून आमदार संजयमामा शिंदे यांच्या गटात जाहीर प्रवेश केला.
यावेळी महाराष्ट्र राज्य बाजार समिती संघाच्या संचालकपदी माजी आमदार जयवंतराव जगताप यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी वामनदादा बदे,जि.प.सदस्य मा.निळकंठ देशमुख,मा.सुर्यकांत पाटील,मा.विलासदादा पाटील, मार्केट कमिटीचे संचालक मा.चंद्रकांत सरडे, दूध संघाचे संचालक मा.अशोक पाटील,मा.ॲड.अजित विघ्ने,मा.ॲड.सविताताई शिंदे,पै.मा.चंद्रहास निमगिरे,मा.तानाजीबापू झोळ, कंदरचे सरपंच मा.भास्कर भांगे,हिंगणीचे सरपंच मा.हनुमंत पाटील,वीटचे सरपंच मा.उदय ढेरे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मा.प्रशांत पाटील, देवळालीचे सरपंच मा.आशिष गायकवाड,मा.रोहिदास सातव,मा.अशोक तकीक,जातेगांवचे मा.प्रविण शिंदे, युवक नेते मा.मानसिंग खंडागळे, जेऊरचे ग्रा.पं.सदस्य,मा.उमेश पाथ्रुडकर,मा.बालाजी गावडे, मा. गौरव झांजुरणे तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
