*श्रावणनगर येथील विठ्ठल हाॅस्पिटलसमोरील गटारीचे काम तात्काळ करण्याची नवनाथ थोरात यांची मागणी
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील श्रावणनगर येथे सांडपाणी व ड्रेनेज पाणी विठ्ठल हाॅस्पिटलच्यासमोर साचल्यामुळे येथील रहिवाशाचे आरोग्य धोक्यात आले आहे सध्या पावसाळा असल्यामुळे साथीचे आजार बळवण्याची शक्यता असल्यामुळे या भागातील गटारीचे काम होणे गरजेचे आहे श्रावणनगरमधील सर्व नागरिक वेळेवर घरपट्टी भरत असुन नागरी सुविधापासुन आम्हाला वंचित रहावे लागत आहे तरी येथील गटारीचे काम करुन नागरिकांच्या आरोग्याची काळजी नगरपालिकेने घ्यावी याबाबतचे करमाळा नगरपालिकेला वारंवांर निवेदन देऊन याकडे दुर्लक्ष केले असुन याबाबत दखल घेऊन गटारीचे काम करावे अशी मागणी नवनाथ थोरात यांनी केली आहे.
