लंपी स्किन चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण करण्यासाठी 15 वित्त आयोगातून ग्रामपंचायतींना परवानगी द्या* : सरपंच परिषद करमाळा तालुका,अध्यक्ष सरपंच डॉ. अमोल दुरंदे
राजुरी प्रतिनिधी
जनावरांमधील लंपी स्किन आजाराचा वाढता प्रादुर्भाव पाहता त्याचे नियंत्रण करण्यासाठी अधिक प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक झाले आहे, त्यामुळे आता प्राण्यांमधील संक्रामक व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम, 2009 प्राप्त अधिकारांचा वापर करत राज्य शासनाने या रोगां बाबतीत संपूर्ण राज्य ‘नियंत्रित क्षेत्र’ म्हणून घोषित केले आहे. लम्पि स्किन हा जलदगतीने पसरणारा अनुसूचित रोग असल्याचे दिसून आले आहे. महाराष्ट्र मध्ये जवळपास 19 जिल्ह्यात लंपी स्किन चा प्रादुर्भाव दिसून आला आहे.
लम्पी स्किन चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लसीकरण करणे गरजेचे आहे म्हणुन शासनाने ग्रामपंचायतींना 15 वित्त आयोगातून प्रतिबंधात्मक उपाययोजना लसीकरण करण्यासाठी निधी उपलब्ध होण्यासाठी निर्देश द्यावे, अशी मागणी सरपंच परिषदेचे करमाळा तालुका अध्यक्ष सरपंच डॉ. अमोल दुरंदे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. दिलीप स्वामी साहेब यांच्याकडे केली.