मानव एकता दिनानिमित्त करमाळा शहरात संत निरंकारी चैरिटेबल फाऊंडेशन, दिल्ली शाखा-करमाळा यांच्यावतीने 27 जुलै रोजी भव्य रक्तदान शिबीर

करमाळा प्रतिनिधी , समयाचे सद्गुरु माला सुदिक्षाजी महाराज यांच्या असिम कृपा आशिर्वादाने करमाळा शहरात संत निरंकारी चैरिटेबल फाऊंडेशन, दिल्ली शाखा-करमाळा यांच्या वतीने मानव एकता दिनानिमित्त सर्व ईश्वर प्रेमी भावीक भक्तांचे एवं बंधू भगिनींचे भव्य रक्तदान शिबीर रविवार दि. २७/०७/२०२५ रोजी संत निरंकारी सत्संग भवन बायपास रोड, निलज चौक करमाळा आयोजित करण्यात आले आहे. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन सकाळी ११ वा.सद्गुरु माता सुदिक्षाजी महाराज यांचे परमशिष्य प. पू. श्री. इंद्रपालसिंहजी नागपाल महाराज (झोनल इन्चार्ज, सोलापूर ३३, संत निरंकारी मंडळ, दिल्ली)प. पू. श्री. बाळासो पवारजी (क्षेत्रिय संचालक, सोलापूर ३३, संत निरंकारी मंडळ, दिल्ली) यांचे प्रमुख उपस्थितीत आयोजित केले आहे. रक्तदान हे खरे जीवनदान असून जास्तीत जास्त महात्म्यांनी या कार्यास सहभागी होऊन मानवी कल्याण कार्यात सहकार्य करावे असे आवाहन श्री. पोपट थोरात (गुरुजी) बँच मुखी-करमाळा मो. ७५८८५०५१९७श्री. रमेश वारे सेवादल संचालक, युनिट नं. १२४७मो. ९९२२१५०७२२ संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन, शाखा-करमाळा यांच्यावतीने करण्यात आले आहे.


