केम येथील उत्तरेश्वर देवस्थानाच्या अन्नछत्राचा 9 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील केम येथे श्री *उत्तरेश्वर मंदिर अन्नछत्र 9 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. श्री उत्तरेश्वर मंदिर येथे वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .या सकाळी सात वाजता श्री उत्तरेश्वर महाराज शिवली॑गास लघुरुद्र अभिषेक झाला सकाळी आठ ते दहा वाजता 51 दांपत्याच्या शुभहस्ते सामुदायिक सत्यनारायण महापूजा करण्यात आली. केमचे सुपुत्र जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांनी सपत्निक सत्यनारायण व शिवाची पूजा केली सकाळी दहा वाजता वर्षभरातील अन्नछत्र दात्यांचा यांचा सत्कार समारंभ संपन्न झाला.
सकाळी साडे दहा वाजता हरिभक्त परायण समाज प्रबोधनकार झी टॉकीज फेम विनोद रोकडे महाराज कोरगावकर यांचे सुश्राव्य हरिकीर्तन किर्तन होऊन दुपारी एक ते तीन वेळेस ग्रामस्थांना व शिवभक्तांना महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी केम व परिसरातील शिवभक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला.याप्रसंगी हजारोच्या संख्येने शिवभक्त उपस्थित होते यावेळी उत्तरेश्वर देवस्थान ट्रस्टचे चेअरमन दादासाहेब गोडसे व ट्रस्टचे सर्व सदस्य तसेच श्री उत्तरेश्वर रक्तदान संघटना यांनी सर्व शिव भक्तांचे स्वागत केले.
