केम येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठया उत्साहात साजरी
करमाळा प्रतिनिधी केम येथे 17 एप्रिल रोजी सायं. 6 वाजता प्रतिमेचे पूजन करून विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भव्य-दिव्य मिरवणूक मोठया जल्लोषात काढण्यात आली. मिरवणूकीसाठी ढोल ताशा, बँजो, हलगीच्या तालावर आंबेडकरी जनसमुदाय नाचत होता. मेन चौक येथे सर्वच महापुरुष यांच्या घोषणा देण्यात आल्या.मिरवणुकीत गावातील व आजूबाजूच्या खेड्यातील आंबेडकरी जनता हजारोच्या संख्येने सहभागी झाली होती.केम गावातील ग्रामस्थांचे देखील मोलाचे सहकार्य लाभले. मिरवणुक काढण्यासाठी शुभम गाडे,विजयसिंह ओहोळ, प्रसाद गाडे, विक्रम ओहोळ, प्रणय देडगे, सोनू मखरे,सत्यशील ओहोळ, संदीप कांबळे या युवा कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले. तसेच जयंती कमिटी मधील नागसेन पोळके,नामदेव गाडे, अमोल ओहोळ, मधुकर गाडे, योगेश ओहोळ, मुनीराज पोळके, सोमनाथ कांबळे, अरुण गाडे,बळीराम ओहोळ, सागर ओहोळ, युवराज कांबळे, दशरथ गाडे तसेच जयंती उत्सव कमिटी मधील सर्वच कार्यकर्त्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
