मंगळवेढा तालुका पत्रकार संघाचा पुरस्कार तानाजी चौगुले यांना जाहीर
मंगळवेढा प्रतिनिधी मंगळवेढा तालुका पत्रकार संघाच्या वतीने सालाबाद प्रमाणे देण्यात येणारा पुरस्कार तानाजी चौगुले यांना जाहीर करण्यात आल्याची माहिती पत्रकार संघाचे अध्यक्ष समाधान फुगारे यांनी दिली या पुरस्काराचे वितरण 6 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता पत्रकार भवन मंगळवेढा येथे मान्यवरांच्या हस्ते देण्यात येणार आहे.
सदर प्रसंगी पत्रकार दिनानिमित्त मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात येणार असून यावर्षीची मंगळवेढा तालुका पत्रकार संघाचे नूतन कार्यकारिणी यावेळी निवडण्यात येणार आहे पत्रकार तानाजी चौगुले यांना पुरस्कार मिळाल्याने आमदार प्रशांत परिचारक आमदार समाधान आवताडे आमदार गोपीचंद पडळकर डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने तालुक्याचे नेते बबनराव आवताडे विठ्ठल कारखान्याचे चेअरमन भगीरथ भालके मंगळवेढा तालुका पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष दिगंबर भगरे नंदकुमार पवार वकील शिवाजीराव काळुंगे यांच्यासह सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील विविध मान्यवर आणि त्यांचे कौतुक केले गेल्या आठ वर्षापासून डिजिटल मीडिया त्याचे महत्त्व लक्षात येऊन तानाजी चौगुले यांनी स्वतःची वेबसाइट चालू करून या भागातील घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम केले आहे तदनंतर त्यांनी युट्युब चॅनेल सुरू करून या क्षेत्रामध्ये भरारी घेतली आहे यापुर्वी त्यांनी दैनिक लोकमत दैनिक पुढारी दैनिक संचार दैनिक माणदेश नगरी सांगोला नगरी साप्ताहिक शहर या ठिकाणी या पत्रकारितेच्या माध्यमातून मंगळवेढा तालुक्यातील विविध प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला आहे याबरोबरच तालुक्यातील दक्षिण भागातील 35 गाव पाण्यावर सर्व तोड लिखाण करून शासन दरबारी या भागातील हा पाणीप्रश्न शासनाच्या लक्षात आणून देण्याचे काम त्यांनी केले आहे
