करमाळा

वाशिंबेचे जिल्हा परिषदेची शाळा आत्ता होणार स्मार्ट आमदार संजयमामा शिंदे यांचे शिफारशीनुसार आदर्श शाळेसाठी पावणेदोन कोटींचा निधी -लोकनियुक्त सरपंच तानाजी बापू झोळ

करमाळा प्रतिनिधी 
महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, समग्र शिक्षा, जिल्हा परिषद सोलापूर, प्राथमिक शिक्षण विभाग अंतर्गत जिल्हा परिषदेच्या आदर्श शाळा विकसित करण्यासाठी करमाळा तालुक्यातून वाशिंबे येथील जिल्हा परिषद शाळेची निवड झालेली असून या शाळेच्या 4 वर्गखोल्या विकसित करणे, हॉल, ग्रंथालय, इत्यादी मोठी बांधकामे करण्यासाठी 1 कोटी रुपयाचा निधी मंजूर झालेला असून शाळेतील टॉयलेट, पाणीपुरवठ्याची व्यवस्था करणे ,संरक्षक भिंत बांधणे, भांडारगृह बांधणे आदी कामांसाठी 30 लाख असा एकूण 1 कोटी 30 लाख निधी मंजूर झालेला असून या निधीमधून जिल्हा परिषद वाशिंबेची शाळा आता तिचा लुक बदलेल ,ती स्मार्ट होईल . या शाळेचा फायदा वाशिंबे या गावाबरोबरच या परिसरातील गोरगरीब मुलांच्या शिक्षणासाठी निश्चितच होईल अशी माहिती सरपंच तानाजी बापू झोळ यांनी दिली.
याविषयी अधिक माहिती देताना ते म्हणाले की, लोकनियुक्त सरपंच म्हणून निवड झाल्यानंतर आपण करमाळा तालुक्याचे आमदार संजयमामा शिंदे यांच्या माध्यमातून वाशिंबे गावाच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधीची मागणी केलेली होती त्याला सकारात्मक प्रतिसाद देत आ.शिंदे यांचे माध्यमातून निधीचा ओघ वाशिंबे या गावाला सुरू असून आत्तापर्यंत शाळा सुधारणेसाठी यापूर्वीच 45 लाख रुपयांचा निधी मिळालेला होता. त्या निधीमधून जुन्या शाळेचे पत्रे बदलणे, भिंतींची दुरुस्ती करणे, रंगकाम करणे, नव्याने सुधारणा करणे इ. कामे यापूर्वीच झालेली आहेत.
सदर कामांनां लवकरच प्रारंभ होऊन प्रत्यक्षात 6 महिन्यांमध्ये सर्व कामे पूर्ण होतील असा विश्वास सरपंच तानाजी बापू झोळ यांनी व्यक्त केला.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group