करमाळा /माढा पोलीस पाटील भरती प्रक्रिया रद्द करण्याची मागणी —-श्री देविदास आप्पा साळुंके मा सरपंच व आर टी आय कार्यकर्ता कोंढार चिंचोली
करमाळा प्रतिनिधी
पोलीस पाटील भरती प्रक्रिया पारदर्शक झाली नाही म्हणून श्री देविदास साळुंके यांनी विभागीय आयुक्त, उपायुक्त पुणे विभाग पुणे यांची विभागीय आयुक्त कार्यालय पुणे येथे आज दि 13/3/2024 रोजी समक्ष भेट घेऊन सदर पोलीस पाटील निवड प्रक्रियेत झालेला काळा बाजार, तशेच निवड ही पारदर्शी न होता पैशाची देवाण घेवाण करून झाली असल्याकारनाणे ती चुकीची व सदर उमेदवाराचे गुण जाहीर न कारता, पहिल्या तक्रारीची दखल न घेता निवड कमिटीने तोंडी मुलाखती घेऊन अति तातडीने सुट्टीच्या दिवशी लेटर देऊन दि 11/3/2024रोजी तोंडी मुलाखतीचा फार्श करून त्यांना ज्यांच्या नावाची निवड करावयाची आहे अगदी त्यांचीच निवड यादी घोषित केली, परंतु या बाबत कोंढार चिंचोली सरपंच व कोंढार चिंचोली येथील पोलीस पाटील पदाचे उमेदवार यांनी लेखी निवेदन देऊन मा उपायुक्त श्री रामचंद्र शिंदे साहेब याची समक्ष भेट घेऊन दिले व याबाबत चर्चा केली त्यावेळेस साहेबांनी सदर विषयाचे गाभीर्य लक्षात घेऊन मा जिल्हाधिकारी सोलापूर यांना चोकशी करण्याचे आदेश देतो आशे आश्वासन दिले तशेच चौकशी होईपर्यंत पोलीस पाटील पदाच्या नियुक्ती देऊ नयेत अशी लेखी मागणी केली, या निवड प्रक्रियेकडे संपूर्ण करमाळा /माढा तालुक्यातील लोकांचे, व इच्छुक उमेदवाराचे लक्ष लागले आहे याबाबत आयुक्त, जिल्हाधिकारी काय निर्णय घेतात त्याची उत्सुकता आहे.
