कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाचा आकर्षक स्टाॅल केंद्रीय माहिती व प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरगन यांनी दिली भेट
*
————————————
दाफचि,मुं : फ्रान्स येथे कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आजपासून प्रारंभ झाला. या महोत्सवाच्या बाजार विभागात महाराष्ट्र शासनाच्या वतीने महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाचा आकर्षक स्टाॅल उभारण्यात आला आहे. या स्टाॅलला केंद्रीय माहिती व प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरगन यांनी आज भेट दिली. यावेळी सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव श्री.विकास खारगे, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.अविनाश ढाकणे यांनी त्यांचे स्वागत केले.
चित्रपटासंदर्भात महामंडळ राबवत असलेली योजना, महामंडळतर्गत राबविण्यात येणारे उपक्रम अशी माहितीपूर्ण-आकर्षक डिझाईन केलेल्या स्टाॅलची यावेळी श्री. मुरगन यांनी पाहणी केली. तसेच महाराष्ट्र शासन चित्रपटाबाबत राबवत असलेल्या विविध योजना, उपक्रमांची माहितीही त्यांनी जाणून घेतली. त्याचबरोबर बाजार विभागासाठी पाठवा असे सांगितले.


