Thursday, April 24, 2025
Latest:
Uncategorized

करमाळा शहर तालुक्यातील प्रश्न सोडवण्या बाबत खासदार रणजितसिंह नाईकनिंबाळकर यांना मनसेचे शहराध्यक्ष नानासाहेब मोरे यांनी केली निवेदनाद्वारे मागणी*

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील मी समस्या सोडवण्यासाठी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर अध्यक्ष नानासाहेब मोरे यांनी विविध मागण्याचे निवेदन दिले आहे याम निवेदनामध्ये करमाळा शहरातील अंडरग्राऊड गटार करणे. करमाळा शहरासाठी अग्निशामकच्या वाढत्या लोकसंख्येच्या अभावी सध्या एक गाडी उपलब्ध आहे. त्यामुळ आजुन दोन गाडी आवश्यकता आहे करमाळा शहरातील अडरग्राऊंड लाईट करणे करमाळा शहरातील ट्रॅाफीकच्या अनुषांगाने करमाळा बाहेरील बाजुस दोन बायपासची आवश्यकता आहे. तर कर्जत रोड ते नगर रोड असा जोडण्यात यावा तसेच रोशेवाडी ते MIDC जेऊर असा जोडण्यात यावा. यामुळे करमाळा शहरातील जडवाहतुकीमुळे अनेक अपघात टळतील. केमची बाजारपेठ मोठी असल्याकारणाने करमाळा ते केम रस्ता हा पंतप्रधान ग्राम योजनें अतंर्गत रोड मंजुर करण्यात यावा या प्रमुख मागण्या करण्यात आल्या असुन सदरबाबतीत माढा लोकसभा मतदार संघाचे खासदार रणजितसिंह नाईकनिंबाळकर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असुन ही कामे लवकरात मार्गी लावण्याचे आश्वासन दिले असल्याचे मनसे शहराध्यक्ष नानासाहेब मोरे यांनी सांगितले आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group