बुधभुषण राज्यस्तरीय काव्य पुरस्कारासाठी कविता संग्रह पाठवण्याचे आवाहन
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुका साहित्य मंडळ”यांच्या वतीने ‘काव्यसंग्रहा’ साठी पुरस्काराचे आयोजन करण्यात आले आहे.पुरस्काराचे हे पहिले वर्ष आहे. पुरस्काराचे स्वरूप,
सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल ,फेटा व रोख रक्कमरू. ५०००/-या पुरस्कारासाठी
१ जानेवारी २०२१ ते ३१ जुलै २०२२
या कालावधीमध्ये प्रकाशित झालेले कविता संग्रह पात्र आहेत.कविता संग्रहाच्या दोन प्रती,अल्प परिचय व फोटो आवश्यक.कविता संग्रह पाठवण्याची शेवटची तारीख : १० सप्टेंबर २०२२ आहे.या तारखेनंतर आलेले कविता संग्रह विचारात घेतले जाणार नाहीत.जास्तीत जास्त कवींनी आपले कविता संग्रह पाठवावेत असे आवाहन कवी प्रकाश लावंड व प्राचार्य नागेश माने यांनी केले आहे.कविता संग्रह पाठविण्याचा पत्ता –
*खलील हारून शेख*
(७३८७४४६७७१)शिवाजी नगर,करमाळा
ता.करमाळा.जि. सोलापूर पिन- ४१३२०३