Tuesday, April 22, 2025
Latest:
करमाळासकारात्मकसाहित्य

कवी साहित्यिक समाजाला दिशा देणारे जेष्ठ साहित्यिक राजेंद्र दाससरांचे कार्य प्रेरणादायी – नागराज मंजुळे

करमाळा प्रतिनिधी कवी साहित्यिक समाजाला दिशा देणारे साहित्यिक राजेंद्र दाससरांचे कार्य प्रेरणादायी असुन दाससरांना करमाळा भुषण पुरस्कार देऊन त्यांच्या साहित्य सेवा कार्याचा गौरव करण्याचा ग्रामसुधार समितीचा उपक्रम स्तुत्य आहे असे मत सिनेअभिनेते व दिग्दर्शक,कलाकार नागराज मंजुळे यांनी व्यक्त केले. ग्रामसुधार समितीच्या वतीने दिला जाणारा सन्मानाचा “करमाळा भूषण” पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. राजेंद्र दास यांना सिनेअभिनेते व दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचे हस्ते यशकल्याणी सेवाभवन येथे देण्यात आला. याप्रसंगी श्री. मंजुळे बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गणेश करे-पाटील हे होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामसुधार समितीचे अध्यक्ष ॲड. डॉ. बाबूराव हिरडे यांनी केले.याप्रसंगी पुढे बोलताना दिग्दर्शक श्री. मंजुळे म्हणाले की, प्रसिद्ध फिल्मी लोक आहेत,त्यांच ग्लॅमर असते, माझा जन्म करमाळयाचा शिक्षण करमाळयात झाले माझी जडणघडण करमाळयात झाली आपला करमाळा लयभारी असुन माझ्या जन्मभुमीत माझ्या हस्ते राजेंद्र दास सरांसारख्या उत्तुंग व्यक्तिमत्वाचा सत्कार होतो आहे याबद्दल करमाळकरांचा आभार मानतो, माझ्यासाठी आजचा आनंदाचा आणि आश्चर्याचा दिवस आहे.माझ्या हस्ते दास सरांचा सत्कार होतोय, हे माझ्यासाठी खुपच महत्वाचे आहे, दास सरांच्या या महत्त्वाच्या आठवणीत मी सामील झालोय,याचा मला आनंद आहे, माझ्या सारख्या माणसाच्या हातून पुरस्कार घ्यायचा तुम्ही आग्रह धरला याचा मला आनंद आहे,मी त्यासाठी कृतज्ञता व्यक्त करतो, आज जरी दाससरांना पुरस्कार दिला असला तरी हा पुरस्कार मलाच मिळाला हे मी समजतोय व हा पुरस्कार माझाच आहे हे मीच घोषीत करतो.असेही दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी म्हटले आहे.याप्रसंगी करमाळा भूषण पुरस्कार या सत्काराला उत्तर देताना प्रा.दास यांनी करमाळा शहरातील आठवणीना उजाळा दिला.तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष व यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गणेश करे-पाटील यांनी प्रा. दाससर व दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्याविषयी विचार व्यक्त करत जोरदार भाषण केले.
यावेळी व्यासपीठावर करमाळा पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे उपस्थित होते. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे सिनेअभिनेते व
दिग्दर्शक, कलाकार नागराज मंजुळे यांचा ग्रामसुधार समितीचे अध्यक्ष
ॲड. डॉ. बाबूराव हिरडे यांचे हस्ते करण्यात आला. याप्रसंगी सत्कारमुर्ति प्रा.दास यांचा परिचय साहित्यिक भीष्माचार्य चांदणे यांनी दिला तसेच मानचिन्हाचे वाचन ग्रामसुधार समितीचे संचालक प्रा. शिवाजीराव बंडगर यांनीकेले. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष व इतर सत्कार पाहुण्यांचा समितीचे उपाध्यक्ष नाथाजीराव शिंदे, संचालक गजेंद्र पोळ, व्हि.आर. गायकवाड, नीलकंठ ताकमोगे, सचिव डी. जी. पाखरे यांनी केला. याकार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुनीता दोशी यांनी केले तर आभार एन. डी. सुरवसे यांनी मानले. याप्रसंगी सर्व क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येनेउपस्थित होते. या कार्यक्रमासाठी परिश्रम यशकल्याणी संस्था व सर्व टिम तसेच ॲड. सचिन हिरडे, आकाश मंगवडे, रोहन माने, कृष्णा खंडागळे आदी जणांनी घेतले.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group