करमाळा

शिवसेना युवा नेते राहुल भैय्या कानगुडे यांच्या वाढदिवसानिम्मित नागरिकांसाठी बस स्टॅन्ड निवारा शेडचे लोकार्पण

करमाळा प्रतिनिधी देवळालीचे सुपुत्र युवा उद्योजक करमाळा विधानसभा अध्यक्ष शिवसेना युवा नेते राहुल कानगुडे यांनी  दुष्काळी परिस्थितीमध्ये सामाजिक उपक्रमाद्वारे वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे .उन्हाळ्यामध्ये देवळाली येथे प्रवासी निवारा स्टॅन्ड केले आहे . या बस स्टॅन्ड शेड  लोकार्पण सोहळा शिवसेना प्रदेश सचिव संजय मशिलकर यांच्या हस्ते  28 फेब्रुवारी रोजी सायंकाळी आठ वाजता होणार आहे. उन्हाळ्यामध्ये उन्हापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी शाळकरी मुले मुली महिला नागरिकांना निवाऱ्याची चांगली सोय झाली आहे
महाराष्ट्राचे सवेंदनशिल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश दादा चिवटे शिवसेना जिल्हाप्रमुख महेश दादा चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळा तालुक्यामध्ये शिवसेनेचे काम जोमाने चालू असून उन्हाळी परिस्थितीमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थितीमध्ये सामाजिक उपक्रमाद्वारे आपला वाढदिवस साजरा केल्यामुळे राहुल कानगुडे व त्यांच्या मित्र परिवाराची कौतुक होत आहे
दुष्काळी परिस्थितीमध्ये सर्वसामान्य नागरिकांना शिवसेनेच्या वतीने जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे  शिवसेना युवा नेते राहुल कानगुडे यांनी सांगितले.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group