राजेश्वर हाॅस्पिटलच्या वर्धापनदिनानिमित्त उद्या रक्तदान शिबिर
करमाळा प्रतिनिधी कोरोना महामारीमुळे मानवी जीवन संकटात आले असून मानवाचे वाचविण्यासाठी रक्ताची अंत्यत गरज असुन रक्त कुठल्याही प्रयोग शाळेत तयार करता येत नाही त्यामुळे रक्तदान करून मानवी जीवन वाचवण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन राजुरी गावचे सरपंच डॉ.अमोल दुरंदे यांनी केले आहे. राजेश्वर हाॅस्पिटलच्या अकराव्या वर्धापनदिनानिमित्त व दिपावलीनिम्मित परिवर्तन प्रतिष्ठानच्यावतीने शनिवार दिनांक ६ नोव्हेंबर रोजी सकाळी 9 ते 3 या वेळेत शिबिर आयोजित करण्यात आले आहे.तरी या शिबिराचा लाभ घेऊन रक्तदान करून या महान कार्यात सहभागी व्हावे असे आवाहन राजुरीचे सरपंच डॉक्टर अमोल दुरंदे यांनी केले आहे.