करमाळा

राजे रावरंभा शेतकरी कंपनीत गरुड झेप घेण्याची क्षमता गणेश भाऊ करे पाटील यांचे प्रतिपादन.

करमाळा प्रतिनिधी 
शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी स्थापन केलेल्या राजे रावरंभा शेतकरी प्रोड्युसर कंपनीच्या स्थापनेपासूनच प्रत्येक घडामोडीचा मी साक्षीदार असून कंपनीचा 3 वर्षाचा आतापर्यंतचा कारभार पाहता ही कंपनी भविष्यात निश्चितच गरुड झेप घेणार असून करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडवून आणण्याची क्षमता या कंपनीत असल्याचा विश्वास यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गणेश भाऊ करे पाटील यांनी व्यक्त केला. राजे रावरंभा शेतकरी प्रोडूसर कंपनीच्या आज दि.25 रोजी तिसऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून मा.श्री. बाबासाहेब गायकवाड (नायब तहसीलदार) ,मा. श्री. राजेंद्र नेटके (तालुका कृषी अधिकारी), मा. श्री. नितीन शेळके (DDM सोलापूर नाबार्ड), मा श्री. कांतीलाल गिते (प्रोजेक्ट मॅनेजर वॉटर भूम) ,कंपनीचे अध्यक्ष डॉ.विकास वीर आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना करे पाटील म्हणाले की, मी इटली या देशाचा दौरा केला. त्या ठिकाणच्या शेतकरी उत्पादक कंपन्यामुळे त्या देशाचा जीडीपी वाढलेला आहे. भविष्यकाळात भारतातील शेतकरी उत्पादक कंपन्याही देशाचा जीडीपी वाढवण्यास मदत करतील. प्रास्ताविक करताना कंपनीचे अध्यक्ष डॉ. विकास वीर यांनी कंपनीची स्थापनेपासून ते आजपर्यंत प्रवास मांडला. यामध्ये वार्षिक उलाढाल, प्रोराईज प्रकल्प अंतर्गत कंपनीचे कोल्ड स्टोरेज, पॅकहाऊस, वजन काटा, ड्रोन इत्यादी 40 लक्ष मूल्य असलेली कामे सुरू असल्याबद्दल उपस्थित सभासदांना विस्तारित माहिती दिली. मा. श्री. कांतीलाल गिते (प्रोजेक्ट मॅनेजर वॉटर) यांनी कंपनी व्यवसाय वाढीबाबत, कंपनीच्या भविष्यातील योजना, कंपनी स्थापन करण्याची उद्दिष्टे यावर आपले मत मांडले.
मा. श्री. राजेंद्र नेटके (तालुका कृषी अधिकारी) यांनी सर्व सरकारी योजनेचे लाभ व त्या अंतर्गत कंपनीला होणारे फायदे हे सर्व उपस्थित संचालक व सभासदांना उद्देशून सांगितले. मा. श्री. नितीन शेळके (DDM नाबार्ड) यांनी कंपनीने 1 कोटी उलाढाल झाली याबद्दल शुभेच्छा दिल्या व उपस्थित सभासदांना कंपनीचे महत्व, कंपनी स्थापन करण्याचे कारण म्हणजे शेतकरी माल पिकवतो पण तो विकू शकत नाही यामुळे कंपनीची स्थापना करणे गरजेची होती हे समजून सांगितले.कार्यक्रमाचा शेवट करताना प्रोराईज प्रकल्प अंतर्गत कंपनी महिला संचालक सौ.अलकाताई नलवडे यांनी सर्व उपस्थितांना ड्रोन प्रात्यक्षिक दाखवले. आभार संचालक प्रा. बिभीषण मस्कर यांनी मानले.

error: Don\'t try to copy. Content is protected !!