वाशिंबेत दिग्विजय बागल यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्याचे वाटप
प्रतिनिधी वाशिंबे.
मकाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन दिग्विजय बागल यांच्या वाढदिवसानिमित्त वाशिंबे गावचे युवक नेते गणेश भाऊ झोळ व नवयुग कला क्रिडा सांस्कृतिक मंडळ यांच्या वतीने अनावश्यक खर्चाला फाटा देत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊ देण्यात आला.यामध्ये जिल्हा परिषद शाळेतील २२५ विद्याथ्यांना वही,पेन व खाऊचे वाटप करण्यात आले.
यावेळी दत्तात्रय कुलकर्णी, राजाभाऊ जगदाळे,गणेश झोळ, सतिश पवार,जगदीश पवार,अमोल शिंदे,भरत शिंदे,बाळासाहेब शिंदे,संतोष झोळ,सतिश झोळ,सुयोग झोळ,शंकर कांबळे, विकास झोळ आदी ग्रामस्थ ऊपस्थित होते.
