मकाई कारखान्याचे चेअरमन दिग्विजय बागल यांच्या वाढदिवसानिमित्त पुर्व सोगाव येथील ग्रंथालयास पुस्तके भेट
प्रतिनिधी वाशिंबे.
आजच्या या युगात वाढदिवसावर लोक लाखो रूपये खर्च करतात. पण सोगावचे ग्रामपंचायतीचे मा. सरपंच स्वप्नील गोडगे यांनी मकाई सहकारी साखर कारखाना चेअरमन युवक नेते दिग्विजय दिगंबरराव बागल यांच्या वाढदिवसानिमित्त वायफळ खर्चाला फाटा देत उदात्त हेतुने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना राज्यसेवा,लोकसेवा,पोलीस भरती सह ईतर स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करतायावा यासाठी पुर्व सोगाव येथील स्वामी विवेकानंद ग्रंथालयासाठी ४०,०००रुपये किमतीची पुस्तके भेट देऊन वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी ग्रंथालयाचे सर्व सदस्यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
