करमाळ्यातील कमलाई अबॅकस ची विद्यार्थिनी सिद्धी देशमुख भारतातील सगळ्यात लहान अबॅकस ग्रॅज्युएट*
करमाळा प्रतिनिधी
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील सिद्धी पृथ्वीराज देशमुख हिने प्रोऍक्टिव्ह अबँकस मध्ये घवघवीत यश मिळवले आहे. भारतातील सगळ्यात लहान अबॅकस ग्रॅज्युएट होण्याचा मान सिद्धी देशमुख हिने मिळवला आहे तर दीक्षा दत्तात्रय दिवटे ही अबॅकस ग्रॅज्युएट झाली आहे.
अबॅकस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून अबॅकस ची राष्ट्रीय परीक्षा २२ डिसेंबर रोजी सोलापूर येथे घेण्यात आली होती. या परीक्षेला एकूण १५ हजार पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. त्यामध्ये करमाळा येथील कमलाई अबॅकस क्लासेसच्या एकूण ४१ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. या परीक्षेचा निकाल ६ फेब्रुवारी रोजी लागला. यामध्ये सिद्धी पृथ्वीराज देशमुख आणि दिक्षा दत्तात्रय दिवटे या दोघीनी अबॅकस ग्रॅज्युएशन ची फायनल परीक्षा दिली.
यामध्ये दोघी उत्तम गुणांनी परीक्षा उत्तीर्ण झाल्या. सिद्धी देशमुख ही अगदी कमी वयात वय वर्ष १० मध्ये अबॅकस ग्रॅज्युएशन करणारी प्रो ऍक्टिव्ह अबॅकस कंपनी मधील भारतातील पहिली विद्यार्थिनी ठरली. यामुळे कंपनीने सिद्धी देशमुख तसेच दिक्षा दिवटे या दोघींना देखील सन्मानपत्र देऊन त्यांचा गौरव केला. तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून सिद्धी देशमुख व दीक्षा दिवटे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तसेच कमलाई अबॅकसच्या शिक्षिका मंजुश्री मुसळे मॅडम यांचेही सर्व क्षेत्रातून विशेष कौतुक करण्यात येत आहे.
कंपनीचे डायरेक्टर गिरीश करडे सर व कंपनीच्या HOD तेजस्विनी सावंत मॅडम या दोघांनी ही दोन्ही विद्यार्थिनीचे तसेच कमलाई क्लासेस करमाळा चे विशेष कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या परीक्षेतील यशस्वी विद्यार्थी:- सिद्धी देशमुख, दीक्षा दिवटे, वरून शेंडगे, राघव चिवटे, अर्पिता परदेशी, ऋषीका अंधारे, दिया कामठे, आरुष नलवडे, मृणाल वारे, रणवीर सापते, सृष्टी निर्गुणकर, अर्पित दोशी, ईश्वरी परदेशी, श्रावणी क्षीरसागर, स्वरा क्षीरसागर, ईश्वरी पुराणिक, श्रेयस चव्हाण, रुद्र कावळे, युवराज साप्ते, अविराज राठोड, पृथ्वीराज साप्ते, वैष्णवी क्षीरसागर, सर्वेश नेटके, श्रेया बोकन, आदित्य त्रिंबके, श्रेया कळसाईत, ईश्वरी माकोडे, रिचल दोशी, श्रेया दाभाडे, श्रीतेज घनवट, वेदिका पुराणिक, सुयश बोकन, प्रणिती माकोडे, मधुरा मुसळे, श्रेया चव्हाण, जानवी पौळ, क्षितिजा माने, ध्रुव जाधव, सानवी क्षीरसागर या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे.
सिद्धी देशमुख, दीक्षा दिवटे तसेच सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून कौतुक व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तसेच कमलाई अबॅकस व कमलाई अबॅकसच्या शिक्षिका मंजुश्री मुसळे मॅडम यांचेही सर्व क्षेत्रातून कौतुक करण्यात येत आहे.
