करमाळा

दिव्यांग व्यक्तींना अंत्योदय कार्ड योजनेत समाविष्ट करण्यात यावे. अन्यथा आंदोलन करू – संदीप तळेकर तालुकाध्यक्ष प्रहार संघटना

करमाळा प्रतिनिधी 
महाराष्ट्र शासन परिपत्रक क्रं|बैठक 2020/प्र/क्र/नापु /28 नुसार निश्चित केलेल्या करमाळा तालुक्यातील सर्व दिव्यांग व्यक्तींना अंत्योदय शिधापत्रिकामध्ये समविष्ठ करण्यात यावे असे नमुद असताना देखील पुरवठा विभागाकडुन कोणतीही कार्यवाही झालेली दिसत नसल्याने संदिप तळेकर यांनी त्यावर कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.दिव्यांग शिधापत्रिकाचे लाभार्थ्यांचे शिधापत्रिकेचे समावेश दिसत नाही तसेच करमाळा तालुक्यातील जे लोक अत्यंत गरीब आहेत त्यांना व विभक्त केलेल्या रेशन कार्ड लाभार्थ्यांना अन्न सुरक्षेचा लाभ मिळत नसल्याने तालुक्यात 2013 पासुन हि उदासिनता दिसुन येत आहे. करमाळा तालुक्यातील लग्न झालेल्या मुली, मयत झालेले शेतकरी यांचा लक्षांश आत्तापर्यंत पुर्ववत करण्यात आलेला नाही लक्षांश पुर्ववत करण्यात यावा व आपल्या स्तरावरून करमाळा पंचायत समिती गटविकास अधिकारी यांना पत्र देऊन प्रत्येक गावातील ग्रामपंचायतीमध्ये दिव्यांग लाभार्थी व्यक्तींचे व फॉर्म भरून घेवुन यादी प्रसारीत करावी असे आदेश दयावा व जे अन्न सुरक्षेचे लाभार्थी इनकम टॅक्स भरतात त्यांची नावे अन्न सुरक्षेचा यादीतुन नावे काढुन टाकण्यात यावीत व गरीब लाभाथ्र्यांची नावे समाविष्ट करण्यात यावीत याबाबत पुढील 15 दिवसात कार्यवाही न झाल्यास 25 आॅगस्ट रोजी दिव्यांग व्यक्ती व शेतकरी लाभार्थी वर्ग यांना घेवुन तहसिल कार्यालसमोर प्रहार स्टार्इलने आंदोलन करण्यात येइल याची नोंद घ्यावी असे प्रहार तालुका अध्यक्ष संदिप तळेकर यांनी निवेदनादवारे तहसिल कार्यालयास कळवले आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group