Friday, April 25, 2025
Latest:
करमाळा

अलकुरेश‌ यंग ग्रुपच्यावतीने आमदार संजयमामा शिंदे माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या उपस्थितीत पंजाब वस्ताद चौकात इफ्तार पार्टी .

करमाळा प्रतिनिधी  अल कुरेश यंग ग्रुपच्या वतीने गुरुवारी करमाळा शहरात पंजाब वस्ताद संगम चौकात इफ्तार पार्टी झाली. आमदार संजयमामा शिंदे व माजी आमदार जयवंतराव जगताप यावेळी प्रमुख उपस्थित होते. माजी उपनगराध्यक्ष अहमद कुरेशी यांच्यावतीने ही इफ्तार पार्टी आयोजित करण्यात आली होती.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष प्रशांत ढाळे, समाजसेवक श्रेणीकशेठ खाटेर, माजी नगरसेवक बलभीम राखुंडे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य उद्धव माळी, माजी नगरसेवक अतुल फंड, माजी नगरसेवक नवनाथ राखूंडे, माजी नगरसेवक सुरेश इंदुरे, हनुमंत फंड, झनक शेठ परदेशी,माजी नगरसेवक अजितसिंह परदेशी माजी नगरसेवक नजीर अहमद कुरेशी, ख्वाजा हुसेन कुरेशी, घस्सू कुरेशी, महमद हाफिज कुरेशी, राजू सय्यद विठ्ठल क्षिरसागर पप्पू उकिरडे सुरज ढेरे यावेळी उपस्थित होते. युसुफ शेख सर  यांनी प्रास्ताविक केले. उपस्थितांचे आभार अल कूरेश यंग ग्रुपचे मार्गदर्शक माजी उपनगराध्यक्ष अहमद कुरेशी यांनी मानले.
error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group