Thursday, April 24, 2025
Latest:
Uncategorized

करमाळा तालुक्यातील प्रस्थापित नेत्यांच्या विकासाच्या भुलथापांना बळी न पडता खऱ्या अर्थाने विकास करण्यासाठी मला आमदार म्हणून निवडून द्या- प्रा. रामदास झोळ सर

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील नेत्यांनी विकासाच्या नावाखाली भुलथापा मारण्याचे काम केले असून, भुलथापांना बळी न पडता करमाळा तालुक्याचा सर्वांगीण विकासासाठी मला एकदा आमदार म्हणून निवडून द्या. आपण दिलेल्या संधीचे नक्की सोने करून दाखवु असे मत प्रा. रामदास झोळ सर यांनी सालसे ता.करमाळा येथे झालेल्या जाहीर सभेत व्यक्त केले आहे . यावेळी व्यासपीठावर शेतकरी कामगार संघर्ष समितीचे अध्यक्ष दशरथ आण्णा कांबळे, सोलापूर जिल्हा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ मंगवडे, काँग्रेस ओबीसी तालुका अध्यक्ष गफुर शेख, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र गोडगे वाशिंबे येथील माजी सरपंच भगवान डोंबाळे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष सुदर्शन शेळके, उपाध्यक्ष सुहास काळे-पाटील, भिमराव ननवरे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते यशवंतराव गायकवाड, श्रीकांत साखरे-पाटील उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना प्रा. रामदास झोळसर सर म्हणाले की रस्ते, पाणी, वीज हे प्रश्न ‌ मूलभूत असून ही कामे लोकप्रतिनिधीला करावीच लागतात परंतु करमाळा तालुक्यातील रस्ते, पाणी, वीज हे प्रश्नही ‌ अध्यापही सुटले नाही करमाळा तालुक्यात विकासाच्या नावाखाली ‌ नुसत्या भुलथापा मारण्याचे काम चालू असून करमाळा तालुक्याचा कागदपत्रे विकास झाला आहे. रस्ते, पाणी, वीज या प्रश्नाबरोबरच ‌ शिक्षण, आरोग्य, रोजगार, ‌ उद्योग ‌ याबाबतही ‌ करमाळा तालुका अत्यंत मागास झाला असून करमाळा तालुक्याला कोणी वाली राहिला नाही. गटातटाच्या राजकारणामध्ये करमाळा तालुका विकासापासून वंचित राहिला असून करमाळा तालुक्याचा एक शेतकरी कुटुंबातील भूमिपुत्र या नात्याने ‌ मी निवडणुकीस लोक आग्रहाखातर उभा आहे. मला सत्ता पैसा मान प्रतिष्ठा प्राप्त करायची नसून करमाळा तालुक्याचा खऱ्या अर्थाने विकास करायचा आहे. शिक्षण हे मानवाच्या प्रगतीचे महत्त्वाचे साधन असून शिक्षणामुळे माणसाची प्रगती होते. शैक्षणिक क्षेत्रात ‌काम करत असताना ‌आपल्या तालुक्याचा विकासही ‌ झाला पाहिजे. याकरिता ‌ सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून मी आपला प्रतिनिधी म्हणून निवडणुकीस उभा आहे. लोकप्रतिनिधी नुसता कोट्यावधी रुपयाचा विकास झाला असे सांगतात मग त्या निधीतून नक्की कोणाचा विकास झाला याचाही जाब आपण मतदार म्हणून विचारला पाहिजे. खऱ्या अर्थाने विकास झाला असता तर ‌ तो दिसला असता परंतु घोषणाबाजीचे राजकारण‌ करमाळा तालुक्यात चालू आहे. आधी केले मग सांगितले या उक्तीप्रमाणे मी शेतकऱ्यांच्या ऊसाला योग्य भाव मिळून देऊन शेतकऱ्याची आदिनाथ, मकाई, कमलाई, भैरवनाथ या कारखान्याची बिले मिळवून देण्याचे काम केले आहे. त्यामुळे शेतकरी बांधवही आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. मराठा समाजाच्या आरक्षण लढ्यामध्ये ही आपण प्रत्यक्ष सहभागी होऊन मराठा समाजाच्या मुलांना ‌ वस्तीगृहभत्ता, ‌ शिष्यवृत्ती भत्ता मिळून देण्याचे काम केले आहे. मराठा संघर्षयोध्दा मनोज जरांगे-पाटील यांच्या माध्यमातून मराठा, ओबीसी समाजाच्या विद्यार्थ्यांना इतर समाजाप्रमाणे शैक्षणिक सवलती मिळून देण्यासाठी काम केले असून शासन निर्णय होण्यासाठी पाठपुरावा करून त्यांना न्याय मिळवून देण्याचे काम केले आहे. बहुजन व सर्व समाजाला न्याय देणारे निस्वार्थी व प्रामाणिक नेतृत्व असणारे मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ मी मराठा, ओबीसी, धनगर, मुस्लिम, बहुजन बांधवांना न्याय मिळून देण्यासाठी राजकीय पद गरजेचे असल्याने विधानसभेच्या या निवडणुकीत आपला माणूस म्हणून उभा आहे. करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांना उजनीचे पाणी योग्य प्रमाणात मिळण्यासाठी समांतर जलवाहिनी करण्यासाठी मी पाठपुरावा करणार असून करमाळा तालुका संपूर्ण बागायत करण्यासाठी उजनीचे हक्काचे पाणी मिळून देणार आहे. याचबरोबर करमाळा तालुक्यात केळी उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असल्याने ‌ केळी संशोधन केंद्र उभा करण्याचे काम करणार असून युवकांच्या हाताला काम मिळून देण्यासाठी ‌ व्यावसायिक शिक्षणाची सोय करून ‌ करमाळा येथील एमआयडीसी मध्ये विविध उद्योग आणून युवकांच्या हाताला काम मिळून देणार असल्याचे त्यांनी सांगितले. आरोग्याच्या बाबतीतही करमाळा तालुका अत्यंत मागास असून ‌ येथे सर्व सोयीनिमित्त ‌ असे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल नाही येथील ‌ रुग्णांना सोलापूर नगर पुणे या ठिकाणी वैद्यकीय ‌उपचार घेण्यासाठी जावे लागत असून यामुळे वेळ पैसा मोठ्या प्रमाणात खर्च होत असून यामुळे अनेकांना ‌ वेळ श्रम पैसा याबरोबर वेळ उपचार न झाल्यामुळे अनेक नागरिकांना प्राणास मुकावे लागले आहे. त्यामुळे करमाळा तालुक्यामध्ये तज्ञ डॉक्टर आणून प्राध्यापक रामदास झोळ सर फाउंडेशनच्या माध्यमातून सवलतीच्या दरात मोठे हॉस्पिटल सुरू करण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले आहे. करमाळा तालुक्यातील आपला हक्काचा माणूस म्हणून मला करमाळा तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आपण एक वेळ संधी देऊन आमदार म्हणून निवडून द्यावे. करमाळा तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी माझ्या *रिक्षा* या चिन्हाचे बटन दाबून मला बहुमताने विजयी करून निवडून द्यावे असे आवाहन प्रा. रामदास झोळ सर यांनी केले आहे. सालसे येथे झालेल्या जाहीर सभेला शेतकरी, महिला, युवक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सभेचे प्रास्ताविक स्वागत श्रीकांत साखरे पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन प्राध्यापक नवले सर तर आभार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र गोडगे यांनी मानले. *चौकट*- करमाळा तालुक्यामधील भुमिपुत्र, सुशिक्षित, सुसंस्कृत, विकासाची दृष्टी असलेले, सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून आलेल्या शैक्षणिक क्षेत्रात उत्तुंग कामगिरी बजावलेल्या प्रा. रामदास झोळ सर करमाळा तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी विधानसभेसाठी उभे असून रस्ते, पाणी, वीज, आरोग्य, उद्योग, रोजगार निर्मितीसाठी आपल्या तालुक्याचा खऱ्या अर्थाने ‌विकास करायचा असेल तर प्रा. रामदास झोळ सर यांना निवडून द्यावे, असे आवाहन “बहुजन शेतकरी कामगार संघर्ष समितीचे अध्यक्ष दशरथ आण्णा कांबळे” यांनी व्यक्त केले आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group