करमाळा विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेश चिवटे ठरले गेम चेंजर. धनुष्यबाणामुळे बागल गटाला नवसंजिवनी…!
करमाळा ( प्रतिनिधी )
गेल्या तीस वर्षापासून करमाळा विधानसभा निवडणुक शिवसेना धनुष्यबाणावर लढवत आहे.मात्र ही जागा ऐन वेळेस भाजपा कडे जाणार असल्याचे लक्षात येताच शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी फिल्डिंग लावून हा मतदारसंघ शिवसेनेकडे ठेवण्यात यश मिळवले व स्वतः दोन पावले मागे घेऊन भाजपाचे दिग्विजय बागल यांना शिवसेनेत घेऊन उमेदवारी बहाल करुन करमाळा तालुक्याच्या राजकारणाचे गेम चेंजर ठरले आहेत.
गेल्या नऊ वर्षापासून राजकीय सत्तेपासून दूर असलेला बागल गट यावर्षीच्या निवडणुकीत उभा राहिल का नाही असा प्रश्न निर्माण झाला होता.
बागल महायुतीत असले तरी विद्यमान आमदार संजयमामा अजितदादा पवार समर्थक असल्यामुळे हा मतदार संघ अजितदादा च्या घडयाळाकडे कडे जाणार असंच समिकरण दिसत होते.
भाजपच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा रश्मी बागल यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून भाजपची उमेदवारी मिळवण्याचा प्रयत्न चालू केला मात्र या उमेदवारीला विरोध झाला. भाजपचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांना शिवसेना पक्षात घेऊन त्यांना धनुष्यबाणाची उमेदवारी द्यावी असा आग्रह जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी धरला होता मात्र
यावर आठ दिवस मुंबई मुक्कामी खलबते सुरू होती
शेवटी देवेंद्र फडवणीस यांनी ही जागा धनुष्यबाण कडेच ठेवा पण माझा उमेदवार द्या अशी भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे मांडली.यावर वाटाघाटी होऊन शिवसेनेची उमेदवारी दिग्विजय बागल यांना देण्यात आली.
आदिनाथ व मकाईमुळे अडचणीत आलेला बागल गट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्षम प्रतिमेमुळे उजळून निघाला आहे.
त्यातच धनुष्यबाण हे चिन्ह मिळाल्याने व करमाळा तालुक्यात गेल्या आडीच वर्षात शिवसेनेच्या माध्यमातून जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी केलेली विकासात्मक कामामुळे बागल गट विधानसभा निवडणुकीत रेस मध्ये आला आहे.करमाळ्याची लढत संजय मामा शिंदे व नारायण पाटील यांच्यातच होईल अशी राजकीय चर्चा होती
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची करमाळ्यात सभा झाल्यानंतर दिग्विजय बागल रेस मध्ये आले असून आता चुरशीची तिरंगी लक्षवेधी लढत रंगली आहे.
एकंदरीत या सर्व राजकीय डावपेचात जिल्हाप्रमुख महेश चिवटे विधान सभेच्या रणांगणात गेमचेंजर ठरले आहेत.
करमाळा विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे स्टार प्रचारक म्हणून महेश चिवटे काम पाहत असून विजयाचा गुलाल वर्षा वर घेऊन जाणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
