Thursday, September 17, 2026
Latest:
Uncategorized

महाराष्ट्र राज्य माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक ब्रिजेशसिंह यांचे डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे अध्यक्ष राजा माने यांनी मानले आभार

मुंबई, दि.४:- महाराष्ट्रातील डिजिटल मिडियाला शासकीय जाहिराती देण्यासंदर्भात “मार्गदर्शक सूचना अधिसूचना” जारी करुन राज्यातील डिजिटल पत्रकारांना राजमान्यता दिल्याबद्दल राज्याच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक ब्रिजेशसिंह यांचे डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना व तमाम डिजिटल पत्रकारांच्यावतीने खास सोलापुरी नॅपकिन गुच्छ देवून आभार मानले.
आज मंत्रालयात ब्रिजेशसिंह यांच्या दालनात राजा माने यांनी भेट घेतली.काल दि.३ जून २०२५ रोजी राज्य शासनाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांमधील अनेक मुद्द्यांवर ब्रिजेशसिंह यांच्याशी चर्चा झाली. डिजिटल पत्रकारिता आणि डिजिटल पत्रकारांच्या विकासासाठी शासन अनुकूल असल्याची ग्वाही त्यांनी दिली.राजमान्यतेचे द्वार खुले करण्याची ऐतिहासिक जबाबदारी राज्य सरकारने पार पाडल्याबद्दल माहिती व जनसंपर्क विभाग ,राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्र्यांनी एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच डिजिटल पत्रकारांच्या चळवळीला गेल्या सहा वर्षांपासून बळ देणारे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे राजा माने यांनी आभार मानले.

error: Don\'t try to copy. Content is protected !!