Thursday, September 17, 2026
Latest:
करमाळानिधन वार्ता

दैनिक लोकमतचे ज्येष्ठ पत्रकार नासीर कबीर यांना मातृशोक मातोश्री श्रीमती रशिदाबी कबीर यांचे दुखःद निधन

करमाळा प्रतिनिधी
करमाळा येथील दैनिक लोकमतचे  जेष्ठ पत्रकार कमलादेवी औद्योगिक वसाहतीचे सचिव नासीरभाई कबीर करमाळा महसुल मंडल अधिकारी हुस्नोदिन कबीर यांच्या मातोश्री रशिदाबी शमसुद्दीन कबीर यांचे  91 वर्षी राहत्या घरी दुखःद निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात तीन मुले दोन मुली सुना नातवंडे पणतू असा मोठा परिवार आहे . सैराट फेम सल्या उर्फ अरबाज शेख यांच्या त्या आजी होत्या .रशिदाबी कबीर यांचे रमजानच्या पवित्र महिन्यात निधन झाल्याने त्याला विशेष महत्त्व असुन रमजान महिन्यात निधन झाल्यानंतर त्यांना स्वर्गात स्थान मिळते अशी धारणा असल्यामुळे हे मरण पवित्र मानले जाते. त्यांची अंत्ययात्रा मोहल्ला गल्ली करमाळा येथुन निघणार असून त्यांच्यावर आनंदबाग येथे आज सायंकाळी पाच वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!