आमदार आपल्या दारी शासकीय योजना पोहोचतील घरोघरी या उपक्रमाचा आज रावगाव येथे शुभारंभ
करमाळा प्रतिनिधी
सरकारच्या योजना सर्वसामन्य नागरिकांना मिळाव्यात म्हणून ‘आमदार आपल्या दारी’ हा उपक्रम करमाळा मतदारसंघात राबविला जाणार असून त्याचा शुभारंभ आज रावगाव येथे करण्यात आला .याप्रसंगी करमाळा तालुक्याचे आ. संजयमामा शिंदे ,माजी आ. जयवंतराव जगताप ,तहसीलदार समीर माने ,गटविकास अधिकारी मनोज राऊत, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर श्रद्धा भोंडवे, कृषी अधिकारी वाकडे यांचेसह उद्धव दादा माळी, जिल्हा परिषद सदस्य राणी वारे, पंचायत समिती सदस्य एडवोकेट राहुल सावंत, पंचायत समिती सदस्य विलास मुळे, तानाजी बापू झोळ ,समाधान भोगे, मानसिंग खंडागळे, भरत अवताडे ,आशिष गायकवाड ,प्रशांत पाटील, भोजराज सुरवसे, दत्ता अडसूळ, सुजित तात्या बागल, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या शितल शिरसागर, स्नेहल अवचर आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना आमदार शिंदे म्हणाले, ‘कोरोना कालावधीमध्ये काम करण्यासाठी अनेक अडचणी होत्या. आता परस्थितीमध्ये सुधारणा होत आहे.
नागरिकांना आपल्या गावजवळ सुविधा मिळाव्यात व शासकीय योजनांची माहिती मिळावी म्हणून हा उपक्रम राबविला जात आहे.शासकीय योजनांची माहिती नागरिकांनी देणे यासह आधार कार्ड, संजय गांधी निराधार योजना, मोतिबींदू तपासणी, एसटी बस पास, प्रधानमंत्री आवास योजना, श्रावणबाळ योजना, उज्ज्वला गॅस योजना, ईश्रम आदी योजनाची माहिती दिली जाणार असून लाभार्थींना प्रमाणपत्र वितरण केले जाणार आहे.
माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी रावगावातील अडीअडचणी सोडवण्यासाठी मामासाहेब सक्षम असून प्रत्येक गावातील , प्रत्येक नागरिकांच्या सर्वच्या सर्व अडचणी सोडवणे कोणत्याच लोकप्रतिनिधींना शक्य नसल्याने, टप्प्याटप्प्याने अडचणी सोडवल्या जातील. रावगावचा विजेचा प्रश्न मामा भविष्यात निश्चितच सोडवतील व रावगावला नवीन सबस्टेशन मंजूर करतील असा विश्वास माजी आमदार जगताप यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी रावगावातील बसस्थानक व ग्रामपंचायत कार्यालय याचा लोकार्पण सोहळा तसेच नवीन सभामंडपाचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. 26/ 11 शहीद दिन असल्यामुळे शहिदांना श्रद्धांजली अर्पण करून, संविधान दिनानिमित्त संविधानाचे वाचन प्रारंभी करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला पंचायत समिती, महसूल विभाग, कृषी विभाग यांच्यावतीने प्राप्त लाभार्थ्यांना घरकुल चावी वाटप, रेशन कार्ड वाटप डिजिटल सातबारा चे वाटप तसेच कृषी प्रमाणपत्राचे वाटप, अपंग लाभार्थ्यांना चेक वाटप, गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र त्यांचे प्रातिनिधिक स्वरूपात मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुजित तात्या बागल यांनी केले. आज रावगाव येथे हा कार्यक्रम होत असला तरी इथून पुढेही मतदारसंघाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये हा कार्यक्रम सतत घेण्यात येणार असून त्याचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.
रायगाव येथील शिबिरामध्ये वंजारवाडी, लिंबेवाडी, भोसे, पिंपळवाडी, मोरवड, पुनवर वडगाव दक्षिण , वडगाव उत्तर येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
