करमाळा येथे हरभरा हमीभाव केंद्राचे उद्घघाटन
करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी आज विठ्ठल सर्वसाधारण सहकारी संस्था मर्यादित,मांगी यांच्या मार्फत शासकीय हरभरा हमीभाव केंद्राचे उद्घघाटन विकासप्रिय आमदार मा.संजयमामा शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी युवक नेते मा.शंभूराजे जगताप, करमाळा अर्बन बँकेचे चेअरमन मा.कन्हैयालाल देवी,ता.पं.सदस्य,मा.ॲड.राहूल सावंत, संस्थेचे अध्यक्ष मा.सुजीततात्या बागल, सचिव आजिनाथ मोरे,मा.तानाजीबापू झोळ,मा.उध्दवदादा माळी,युवा नेते मा.अशपाक जमादार, हनुमान बागल पप्पू शिंदे मानसिंग खंडागळे सुरज ढेरे व ग्रामस्थ उपस्थित होते.
या हमीभाव केंद्राचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी सातबारा व आठ अ पिक पेरा नोंद असलेला उतारा जमा करावा तसेच मोबाईल नंबर ,आधारकार्ड झेरॉक्स व बँक पासबुकही जमा करावे. 5 हजार 230 रुपये प्रतिक्विंटल याप्रमाणे या हमीभावाप्रमाणे हरभऱ्याची खरेदी केली जाणार असून हेक्टरी 6.5 क्विंटल हरभरा खरेदी केला जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी ऑनलाईन हरभरा पिकाची नोंद आपल्या उताऱ्यावरती करून घ्यावी असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष सुजित तात्या बागल व सचिव आजिनाथ मोरे यांनी केले आहे .
दरम्यान सोलापूर जिल्ह्यात हरभरा या पिकाचे उत्पादन अधिक असल्याने हेक्टरी 10 क्विंटल हरभरा शासनाने खरेदी करावा अशी मागणी शेतकर्यांनी आमदार संजय मामा शिंदे यांच्याकडे याप्रसंगी केली . त्यानुसार आमदार शिंदे यांनी वरिष्ठ पातळीवरती याचा पाठपुरावा करून जिल्ह्याला हेक्टरी 10 क्विंटल हरभरा खरेदी करण्यास परवानगी मिळावी यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले.
