Thursday, April 24, 2025
Latest:
आध्यात्मिककरमाळा

शेलगाव क येथील ग्रामदैवत नागनाथ महाराजांची उद्या यात्रा… भाविकांनी उपस्थित राहण्याचे यात्रा कमिटीचे आवाहन


शेलगाव प्रतिनिधी
शेलगाव क चे ग्रामदैवत नागनाथ महाराजांची यात्रा दरवर्षी श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारी असते. परंपरेप्रमाणे रविवारी रात्री कीर्तनाचा कार्यक्रम होत असतो. सोमवारी सकाळी नागनाथ महाराजांची पालखी गावातून काढली जाते. सकाळी 8 ते 10 या वेळेमध्ये पालखी सोहळा संपन्न होतो .त्यानंतर 10 ते 2 या वेळेमध्ये राज्यभरातून आलेल्या नामांकित प्रबोधनकार भारूडकार यांच्या भारुडांचा कार्यक्रम होत असतो. मनोरंजनातून प्रबोधन असा हा कार्यक्रम असतो. या भारुडकरांना योग्य मानधन व वाहतूक खर्चही दिला जातो . दुपारी 2 नंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होतो.रात्री नागनाथ महाराजांची मिरवणूक छबिना काढला जातो.
शेलगाव क चे ग्रामदैवत नागनाथ महाराज हे जागृत देवस्थान मानले जाते. पंचक्रोशीतील सौंदे, वरकटणे ,देवळाली, अर्जुननगर,फिसरे आदी गावातील भावीक फक्त मोठ्या संख्येने या यात्रा उत्सवांमध्ये सहभागी होत असतात. दुर्दैवाने ग्रामस्थांमध्ये मतभेद होऊन 2011 सालापासून गावामध्ये 2 यात्रा सोहळे होण्यास सुरुवात झाली होती . अनेक प्रयत्न करूनही एक यात्रा होत नव्हती. सन 2018 साली गावाने पाणी फाउंडेशन मध्ये उल्लेखनीय काम केल्यानंतर गावांच्या एकजुटीचा विजय म्हणून गावामध्ये एकच यात्रा संपन्न झाली .कोरोणा कालावधीत यात्रा झाल्या नाहीत ,परंतु गतवर्षी 2022 पासून पुन्हा 2 यात्रांचा सोहळा गावामध्ये सुरू झाला.
यावर्षी गावातील सर्व तरुण वर्गाने राजकीय गट तट ,मतभेद विसरून एक यात्रा करण्यासाठी गावातील दोन्ही यात्रा कमिटीच्या सदस्यांना एकत्रित करून एक यात्रा करण्याचा प्रस्ताव मांडला. 3 बैठका झाल्या आणि त्यातून समन्वय साधून यावर्षीपासून एकच यात्रा सोहळा करण्याचा निर्णय तरुण वर्गांनी ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली घेतला. तरुण वर्ग उत्साहाने यात्रा पार पाडण्यासाठी प्रयत्नशील आहे. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे यावर्षी यात्रा सोहळ्यात मुलांच्या मनोरंजनासाठी पाळणा , खेळणी आलेली आहेत. तालुक्यातील नागरिकांनी यात्रा सोहळ्यासाठी उपस्थित रहावे असे आवाहन यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group