आमदार संजयमामा शिंदे यांचा करमाळा तालुका गाव-भेट दौरा मंगळवार१०/०१/२०२३ पासुन सुरु
करमाळाा प्रतिनिधी – आमदार. संजयमामा शिंदे यांनी गेल्या वर्षी *आमदार आपल्या दारी* हा उपक्रम तालुकाभर राबविला आणि यशस्वी झाला. त्यानंतर चालु वर्ष २०२३ मधे *गाव भेट दौरा* उपक्रम हाती घेतलेला असुन, या गावभेट दौर्याचे निमित्ताने आमदार. संजयमामा शिंदे गावोगावी जाऊन सर्वसामान्य जनतेच्या अडीअडचणी समजावुन घेणार आहेत. या दौर्याचे निमित्ताने कार्यकर्त्यांनी कोणताही डामडौल न करता उपस्थित रहावे असे आवाहान त्यांनी केलेले असुन.. आपल्या गावातील सर्वसामान्य नागरिकांच्या वैयक्तिक स्वरूपाच्या व सार्वजनिक समस्यांचे निराकरण तत्परतेने व्हावे हा त्यांचा या दौर्यामागचा उद्देश आहे. या कार्यक्रमाचे वेळी तालुक्याचे प्रत्येक गावात आमदार साहेब पोहोचणार असुन, त्या त्या गावातील प्रत्येक नागरिक बंधु भगिनींनी राजकीय गट-तट बाजुला ठेऊन या कार्यक्रमाचे वेळी उपस्थित रहावे असे आवाहन आमदार कार्यालयाचे वतीने करण्यात आलेले आहे.
