Wednesday, April 23, 2025
Latest:
करमाळा

विकासरत्न लोकनेते स्व. कल्याण भाऊ गायकवाड यांच्या चतुर्थ पुण्यस्मरणानिमित्त हरीकिर्तन भव्य रक्तदान शिबिर ॲम्बुलन्स लोकार्पण सोहळा

देवळाली प्रतिनिधी देवळाली गावचे विकासरत्न लोकनेते स्वर्गीय कल्याणभाऊ उध्दव गायकवाड यांच्या चतुर्थ पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादनाचा कार्यक्रम मंगळवार दि ९ जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता आयोजित करण्यात आला असून सकाळी दहा ते बारा या वेळेमध्ये ह भ प अविनाश भारती आंबेजोगाई यांचा हरी किर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा हे मानुन काम करणारे कल्याण भाऊ गायकवाड यांच्या स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव आशिष कल्याण गायकवाड अक्षय कल्याण गायकवाड गायकवाड कुटुंबाच्या वतीने करमाळा शहर व तालुक्यासाठी नागरिकांना आरोग्यसेवा लवकर उपलब्ध होण्यासाठी ॲम्बुलन्स देण्यात येणार असून याचा लोकार्पण सोहळा करमाळ्याचे आमदार संजयमामा शिंदे यांच्या हस्ते होणार आहे.या सेवेसाठी उपसरपंच पोपट बोराडे अक्षय गायकवाड संदीप गायकवाड यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच सामाजिक उपक्रमाद्वारे रुग्णाचे प्राण वाचवण्यासाठी रक्तदान हेच जीवनदान म्हणुन भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. शिबिराचे उद्घघाटन करमाळ्याचे पोलीस उपविभागीय अधिकारी विशाल हिरे साहेब पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे साहेब यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्यास वीस लिटरचा जार सप्रेम भेट देण्यात येणार असून रक्तदान शिबिर दुपारी बारा ते पाच या वेळेत गायकवाड फार्म हाऊस दिगंबर रावजी बागल पेट्रोल पंपा जवळ देवळाली येथे होणार आहे भोजनाची सोय करण्यात आली आहे .तरी या कार्यक्रमास उपस्थित राहुन रक्तदान शिबिरामध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन देवळालीचे सरपंच युवा नेते आशिष गायकवाड अक्षय गायकवाड तसेच गायकवाड कुटुंबाच्यावतीने करण्यात आले आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group