सुसंस्कृत सुशिक्षित स्वाभिमानी राजकारणाचा खरा आदर्श यशवंतराव चव्हाण -डाॅ.राजेंद्र दास
करमाळा प्रतिनिधी
आजचा महाराष्ट्र पुरोगामी आणि सर्वच क्षेत्रांत प्रगत म्हणून ओळखला जातो, याचे सारे श्रेय निर्विवादपणे माजी मुख्यमंत्री कै यशवंतराव चव्हाण यांना जाते. आदर्श नीतिमूल्य, स्वच्छ चारित्र्य असणाऱ्या यशवंतरावांचे कार्य आजच्या तरुण पिढीने लक्षात घ्यावे. सुसंस्कृत सुशिक्षित आणि स्वाभिमानी राजकारणाचा आदर्श म्हणजे यशवंतराव चव्हाण होय असे मत जेष्ठ साहित्यिक डाॅ.राजेंद्र दास यांनी व्यक्त केले.डॉ.दास हे प्रतापसिंह मोहिते-पाटील महाविद्यालयातील यशवंतराव चव्हाण जयंती महोत्सव व मराठी राजभाषा सप्ताहाच्या समारोपानिमित्त कार्यक्रमात बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. गणेश करे-पाटील यांनी यशवंतराव चव्हाणांच्या आयुष्यातील असामान्य गोष्टींवर प्रकाश टाकला तर करमाळा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी यशवंतराव चव्हाण व आज या युवक आणि सद्यस्थितीवर भाष्य केले.कार्यक्रमानंतर वृक्षारोपणाचा कार्यक्रम मान्यवरांच्या हस्ते पार पडला. याप्रसंगी प्रा.पी.के.शहा, रमेश शिंदे, महादेव गोफणे, प्रा.भिष्माचार्य चांदणे, रवि लोंढे, प्रा.डॉ.पाटील, डाॅ.कोळेकर, प्रा.जाधव, प्रा.गायकवाड, प्रा.चोपडे, प्रा.भोसले आदी मान्यवर व युवक बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ प्रवीण देशमुख यांनी केले. सूत्रसंचालन शिवानी कोळेकर यांनी केले तर आभार प्राचार्य महादेव वाघमारे यांनी मानले.
