राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आमदार संजयमामा शिंदे यांनी केलेली विकासकामे जनतेपर्यंत पोहचवुन मताधिक्य मिळवून देण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे-भरत भाऊ आवताडे* *करमाळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसची कार्यकारणी जाहीर*
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काॅंगेस पक्षाचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून आमदार संजयमामा शिंदे यांनी तालुक्यात विकासकामे केली असुन करमाळा तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी संजयमामा शिंदे मताधिक्याने विजयी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भरत भाऊ आवताडे यांनी व्यक्त केले. करमाळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारिणीची निवड करमाळा येथील शासकीय विश्रामगृहात जाहीर करण्यात आली.आमदार संजय मामा शिंदे यांच्या हस्ते निवडीचे पत्र देऊन नुतन कार्यकारणी पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी प्रांतिक सदस्य तानाजी बापु झोळ, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभिषेक आव्हाड, जिल्हा उपाध्यक्ष आशपाक जमादार कार्याध्यक्ष सुजित बागल आदिनाथ सहकारी साखर कारखाना माजी संचालक राजेंद्र धांडे उपस्थित होते.. यावेळी करमाळा तालुक्याची राष्ट्रवादी काँग्रेसची कार्यकारणी जाहीर करण्यात आली असून करमाळा तालुका उपाध्यक्षपदी उदय नवनाथ ढेरे वीट अमोल दिनकर भोसले निमगाव देवा ज्ञानदेव लोंढे करमाळा
सोमनाथ नवनाथ रोकडे मु.पो. वांगी-३
सुभाष अभंग उपाध्यक्ष यांची निवड करण्यात आली असून सचिवपदी बबनराव मुरूमकर विशाल विश्वनाथ सरडे घोटी, सरचिटणीसपदी अमोल आजिनाथ फरतडे हिवरे सहसचिवपदी प्रशांत पोपट शेंडे सोगाव पश्चिम चिटणीसपदी चंद्रकांत विलास जगदाळे हिसरे तर करमाळा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसची भुमिका मांडण्यासाठी करमाळा माढा मतदार विधानसभा मतदारसंघ प्रवक्तेपदी ॲड अजित सर्जेराव विघ्ने केत्तुर नं 1करमाळा प्रवक्त्या म्हणून डॉ. गोरख शिवदास गुळवे टाकळी यांची तर खजिनदारपदी गणेश मनोहर गुंडगिरे ,प्रसिद्धी प्रमुखपदी,अमोल रमेश चाळक फिसरे कार्यकरणी सदस्य म्हणून रवींद्र रामहरी नवले यांची निवड करण्यात आली आहे. या निवडी प्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अभिषेक आव्हाड नूतन करमाळा माढा विधानसभा प्रवक्ते ॲड अजित विघ्ने ,प्रवक्ते डॉक्टर गोरख गुळवे, उपाध्यक्ष देवा लोंढे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.नुतन सर्व पदाधिकारी यांनी येणाऱ्या लोकसभा विधानसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या नेतृत्वाला पाठबळ देऊन संजयमामा शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून केलेल्या विकासकामे जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम करावे करमाळा तालुक्यातील जनता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला येणाऱ्या निवडणुकीत मताधिक्य मिळवून देणार असुन आमदार संजयमामा शिंदे यांना पंधरा ते वीस हजार मताचा लीड मिळवून कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आवाहन करमाळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भरत भाऊ आवताडे यांनी सांगितले आहे.