Friday, July 31, 2026
Latest:
Uncategorized

वाशिंबे येथे आ. संजयमामा शिंदे यांच्या निधीतील मंजूर कामांचे भूमिपूजन संपन्न*        

करमाळा प्रतिनिधी:- आमदार संजयमामा शिंदे यांच्या निधीतून वाशिंबे येथे ३५ लाख रु. निधी मंजूर झाला असून या विकास कामांचे भूमिपूजन आज पार पडला.या विकास कामांमध्ये केतुर सोगाव रस्ता ते गौतम रंदवे घर रस्ता सिमेंट काँक्रीट करणे- रु.10 लक्ष,वाशिंबे येथे मज्जिद समोर सभा मंडप बांधणे रु.10 लक्ष, वाशिंबे येथील रेल्वे लाईन ते संजय गायकवाड वस्ती रस्ता खडीकरण करणे रु.5 लक्ष,वाशिंबे येथील रेल्वे पूल ते भैरवनाथ मंदिर रस्ता खडीकरण करणे रु.5 लक्ष,वाशिंबे येथील हायस्कूल ते रामचंद्र पाटील वस्ती रस्ता खडीकरण करणे रु.5 लक्ष , आदी कामांचा समावेश आहे. या भूमिपूजन प्रसंगी वाशिंबे गावचे सरपंच तानाजी बापु झोळ, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ  उपस्थित होते.

error: Don\'t try to copy. Content is protected !!