Friday, April 25, 2025
Latest:
करमाळा

मकाई साखर सहकारी साखर कारखान्यासाठी अपात्र अर्ज मंजूर होतील असा आमचा विश्वास- प्रा. रामदास झोळ                     

  करमाळा प्रतिनिधी मकाई सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये आम्ही सर्व उमेदवाराचे अर्ज अटी शर्तीची पूर्तता करून अर्ज दाखल केले असताना आमचे अर्ज अपात्र झालेले असुन ते अर्ज नक्कीच मंजूर होतील असे मत मकाई बचाव समितीचे प्रमुख प्राध्यापक रामदास झोळ सर यांनी व्यक्त केले. बारा बंगले करमाळा येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते या पत्रकार परिषदेला आदिनाथचे माजी अध्यक्ष वामनराव बदे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रवींद्र गोडगे अमोल घुमरे उपस्थित होते.यावेळी पुढे बोलताना प्राध्यापक रामदास   झोळ सर म्हणाले की तीन वर्षे सलग ऊस घालण्याचा मुद्दा चुकीचा असून इतर साखर कारखान्याने 79 बी नुसार ऊस घालणे बंधनकारक नसल्याचा नियम असताना घटनेत कारखान्याचे उपविधीमध्ये बदल न केल्यामुळे अर्ज अपात्र ठरले आहे.काल झालेल्या सुनावणीमध्ये‌ आम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.  सोलापूर जिल्ह्यामध्ये संत शिरोमणीमध्ये  असे असतानाही सर्व  अर्ज मंजूर केले आहेत त्यामुळे आमचेही अर्ज मंजूर होतील प्रादेशिक सहसंचालक यांच्याकडे अर्ज मंजूर होऊन  आम्हास नक्की न्याय मिळेल याबाबत आम्हाला अपेक्षेनुसार न्याय मिळाला नाही तर उच्च न्यायालयात आम्ही जाणार असल्याचे प्राध्यापक रामदास झोळ‌ सर  यांनी सांगितले

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group