करमाळा

करमाळा शिवसेना वैद्यकीय मदत सहकक्षप्रमुख शिवकुमार चिवटे यांच्या प्रयत्नातून* *वाकडी ता. परांडा जि.धाराशिव येथील केशव इंगळे या रुग्णाची दोन लाख रुपयाची खुब्याची शस्त्रक्रिया मोफत

करमाळा प्रतिनिधी वाकडी तालुका परांडा येथील रहिवाशी असलेले केशव इंगळे हे झाडावरून पडल्याने त्यांचे दोन्ही खुबे बाद झाले होते घरची परिस्थिती बेताची असल्याने त्यांना आर्थिक मदतीची अत्यंत गरज होती. अशा बिकट परिस्थितीमध्ये त्यांचे साडू लक्ष्मी सायकल मार्ट चे मालक सचिन शेळके रा.फंड गल्ली करमाळा यांनी शिवकुमार चिवटे
तालुका शिवसेना वैद्यकीय मदत सहकक्ष प्रमुख व डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशन समन्वयक यांच्याकडे संपर्क साधला होता. त्यांच्या योग्य मार्गदर्शनाने मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचे महाराष्ट्राचे प्रमुख श्री.मंगेश चिवटे यांच्या वडिलांच्या ८३ व्या वाढदिवसानिमित्त १९ एप्रिल २०२३ रोजी अमरनाथ टाॅवर, करमाळा येथे भरविण्यात आलेल्या आरोग्य शिबीर मध्ये शिवकुमार चिवटे यांनी श्री.मंगेश चिवटे विशेष कार्य अधिकारी मुख्यमंत्री सचिवालय यांच्याशी पेशंटची प्रत्यक्ष भेट घालून दिली होती त्याचवेळी मंगेश चिवटे यांनी पेशंट केशव इंगळे यांना ही शस्त्रक्रिया पुर्णतः मोफत करून देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर शिवकुमार चिवटे यांनी पाठपुरावा केला होता.
शिवसेना सोलापूर जिल्हाप्रमुख महेश (दादा) चिवटे, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यक रोहित वायभसे, तालुका कक्षप्रमुख दिपक पाटणे यांच्या सहकार्यातून दोन लाख रुपयांचे मातोश्री गंगुबाई संभाजी शिंदे हाॅस्पिटल ठाणे येथे मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली. केशव इंगळे यांच्या परिवाराने केलेल्या सहकार्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख मंगेश चिवटे साहेब,मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यक कक्षाचे गजानन नारलवर सर, ॠषिकेश देशमुख सर व तसेच शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या संपूर्ण महाराष्ट्राच्या टीम चे आभार मानले.
माझी घरची परिस्थिती साधारण असल्यामुळे हीप रिप्लेसमेंट ही दोन लाख रुपयांची शस्त्रक्रिया करणे अशक्य होते अशा परिस्थितीमध्ये माझे साडू सचिन शेळके रा.फंड गल्ली करमाळा यांनी शिवकुमार चिवटे यांच्याशी माझी भेट घालून देऊन त्यांच्या मदतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांच्या सहकार्याने मातोश्री कै. गंगुबाई संभाजी शिंदे हॉस्पिटल ठाणे येथे डाॅ.सचिन पांडे व मॅनेजर प्रणय जाधव सर यांच्या मार्गदर्शनाखाली माझी दोन लाख रुपयांची शस्त्रक्रिया मोफत करण्यात आली आहे. सध्या एक खुब्याचे ऑपरेशन झाले असून दोन महिन्यांनी दुसऱ्याही खुब्याचे ऑपरेशन मोफत करण्यात येणार आहे. शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे मी मनापासून आभार मानतो.गोरगरीब सर्वसामान्य जनतेने अशा सुविधेचा लाभ घ्यावा असे आव्हान केशव इंगळे यांनी केले आहे. केशव इंगळे रा.वाकडी ता.परंडा जि.धाराशिव*

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group