Monday, February 16, 2026
Latest:
करमाळा

यशवंतराव चव्हाण महाविद्यालय येथे डॉ. सौ. केसरजहाँ लिखित अब्बा बरोबर आहेत या पुस्तकाचे प्रकाशन उत्साहात

करमाळा प्रतिनिधी यशवंतराव चव्हाण महाविद्यालय येथे डॉ. सौ. केसरजहाँ लिखित अब्बा बरोबर आहेत या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा नुकताच उत्साहात पार पडला. शब्दशिवार प्रकाशन, मंगळवेढा यांनी प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्या विकास मंडळाचे सचिव मा. श्री. विलासरावजी घुमरे (सर) होते. प्रमुख पाहुणे म्हणून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव, प्रसिद्ध कवी व वक्ते डॉ. शिवाजी नारायणराव शिंदे उपस्थित होते.
प्रकाशन प्रसंगी सुप्रसिद्ध कवी तथा शब्दशिवार प्रकाशनचे प्रकाशक मा. इंद्रजीत घुले, सुप्रसिद्ध लेखक डॉ. राजेंद्र दास, सुप्रसिद्ध कवी मा. सुरेश शिंदे, संस्थेचे विश्वस्त चंद्रशेखर शिलवंत सर, मा. श्री. अजयकुमार भोसलेसाहेब, सिमरन भोसले, डॉ. अश्विन अंबी आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली.
महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. अभिमन्यू माने  कनिष्ठ विभागाचे प्रशासन अधिकारी श्री. संभाजी किर्दाक यांच्यासह कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपल्या मनोगतात डॉ. शिवाजी नारायणराव शिंदे यांनी साहित्य हे समाजपरिवर्तनाचे प्रभावी माध्यम असल्याचे सांगून अब्बा बरोबर आहेत या पुस्तकातील विचारप्रवाह समाजमनाला दिशा देणारा असल्याचे प्रतिपादन केले. अध्यक्षीय भाषणात मा. विलासरावजी घुमरे यांनी अशा साहित्यनिर्मितीमुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनसंस्कृती वृद्धिंगत होते, असे मत व्यक्त केले.
लेखिका डॉ. सौ. केसरजहाँ यांनी आपल्या लेखनप्रक्रियेविषयी सांगताना पुस्तकामागील प्रेरणा आणि सामाजिक बांधिलकी अधोरेखित केली. उपस्थित मान्यवरांनी पुस्तकाचे कौतुक करत लेखिकेला पुढील साहित्यिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. मुक्ता काटवटे , सुत्रसंचालन प्रा. विष्णू शिंदे, आभार सिमरन भोसले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

error: Don\'t try to copy. Content is protected !!