उजनी धरण आज संध्याकाळी येणार प्लसमध्ये
करमाळा प्रतिनिधी पुणे जिल्ह्यातील धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची जोरदार बॅटींग सुरु असल्याने भिमा नदी पात्रात प्रचंड प्रवाहाने पाणी येतेय.उजनी धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरु आहे.तर पुणे शहरात देखील सातत्याने पाऊस लागून आहे.त्यामुळे भीमा नदी पात्रात येणारा पाण्याचा विसर्ग मोठ्या स्वरुपात येत असल्याने अवघ्या काही तासात मायनस(वजा) -1.94 टक्के मध्ये असणारे उजनी धरण हे प्लस मध्ये येऊ शकते.
मंगळवारी दि.१२ जुलै रोजी दौंड मधून 37592 क्युसेक्स इतक्या दाबाने उजनी धरणात पाणी येत असल्याने उजनीची पाणी पातळी झपाट्याने वाढते आहे.पावसाची संततधार अशी लागून राहिली तर अगदी काही दिवसातचं उजनी शंभरी गाठू शकते.सध्या अति दाबाने भीमा नदी पात्रात पाणी येत असल्याने भीमा नदी काठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.सध्या उजनी धरणात बंडगार्डन मधून 22055 क्युसेक्स् तर. बंडगार्डनसह दौंड मधून 37592 क्युसेक्स इतक्या दाबाने पाणी येत आहे.
सध्या असलेली उजनी धरणाची स्थिती :- (दि.१२ जुलै १२ वाजता)
एकूण पाणीपातळी 490.880 मी.
ए.पाणीसाठा 62.62 टीएमसी
उपयुक्त पाणीसाठा -29.42 टीएमसी
टक्केवारी -1.94 टक्के
उजनीत येणारा विसर्ग
दौंड : 37592 क्युसेक्स
बंडगार्डन : 22055 क्युसेक्स्
