दत्तकला शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारे रामदास झोळ यांचे कार्य प्रेरणादायी -नवनाथ बापु झोळ
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील वाशिंबे गावचे सुपुत्र पुणे जिल्ह्यामध्ये उजाड माळरानावर नंदनवन फुलून करमाळा तालुक्यातील विद्यार्थ्यांची शिक्षणाची सोय करणारे कुठलाही शैक्षणिक वारसा नसताना आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर शैक्षणिक क्षेत्रात प्रतिकूल परिस्थितीवर मात करून शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचून करमाळा तालुक्याचे नाव महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये अजरामर करणारे रामदास झोळ सरांचे कार्य करमाळा तालुकावासियांसाठी प्रेरणादायी असून त्यांचा आम्हास सार्थ अभिमान वाटतो असे मत आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक नवनाथ बापु झोळ यांनी वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले. दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, करमाळा भूषण, शिक्षणमहर्षी मा.श्री.प्रा.रामदासजी झोळ सर यांच्या वाढदिवसानिमित्ताने वाशिंबे स्मशानभूमी परिसरात वृक्षारोपण तसेच गावात ई-श्रम कार्ड शिबीराचे आयोजित करण्यात आले होते. विविध ठिकाणी सिमेंट बाकडे बसवण्यात आली असून सामाजिक उपक्रमांद्वारे वाढदिवस साजरा करण्यात आला . यावेळी नवनाथ बापू झोळ, भाऊसाहेब झोळ,अनुरथ दादा झोळ, हर्षवर्धन पाटील,आनंद झोळ, रणजीत शिंदे, सचिन भोईटे,आण्णा झोळ, अब्बास शेख, राहुल झोळ, प्रसाद धोकटे,पप्पू शिंदे आदि युवक ग्रामस्थ सहभागी झाले होते.