करमाळा

करमाळा शहरातील वीर चौकात (रामाचा हौद) नगरपालिकाचे ठेकेदाराने गटारी खोदुन केला रस्ता बंद बांधकाम ठेकेदाराने धरले गावास वेठीस

करमाळा प्रतिनिधी
करमाळा नगरपरिषदेचा बांधकाम ठेकेदाराने वीर चौकात गटार दुरुस्ती करणेचे काम घेतले असुन किल्लावेस ते फुलसौंदर चौक व खडकपुरा ते दगडी रोड कडे वाहतुक करणारा हां रस्ता गेल्या आठ दिवसापासुन वाहतुकीसाठी बंद केला असून सदर ठेकेदाराने गटार बांधकामासाठी रस्ता खोदुन ठेवला असुन या भागात हाकेच्या अंतरावर सेन्ट्रल मुलांची शाळा तसेच श्री, कमलादेवी कन्या प्रशाला,किल्ला वेस शेजारील मुलींची शाळा असुन या ठिकाणी पहिली ते चौथी चे लहान मुले मुलीं येतात परंतु रस्ता बंद असल्यामुळे त्यांना कुंकू गल्ली किंवा मोहल्ला गल्लीतुन यावे लागते तर काही मुले खड्यात उतरून शाळेत येताना दिसत आहे अशा लहान मुलाना वेठीस धरणारा ठेकेदारावर योग्य ती कार्यवाही करून लवकरात लवकर गटार बांधकाम करून रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात यावा अशी मागणी करमाळा अर्बन बॅकेचे माजी उपाध्यक्ष फारुक जमादार यांनी करमाळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी बालाजी लोंढे यांच्या कड़े केली आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group