युवा नेते दिग्विजय बागल यांचे कार्य प्रेरणादायी-सौ.रश्मीदिदी बागल
करमाळा प्रतिनिधी. स्व. दिगंबरराव बागल मामा यांच्या विचाराचा वारसा जपुन मकाई साखर कारखाना अनंत अडचणीवर मात करून संघर्षमय प्रवास करत यशस्वीपणे चालवुन समाजसेवेतुन राजकारणात लोककल्याणाचा यशस्वी वसा जपणारे दिग्विजय बागल यांचे कार्य प्रेरणादायी आहे असे मत बागल गटाच्या स्वाभिमानी नेत्या सौ रश्मी दिदी बागल यांनी व्यक्त केले.श्री मकाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन बागल गटाचे युवा नेते दिग्विजय भैय्या प्रिन्स बागल यांच्या 12 जानेवारी रोजी असलेल्या वाढदिवसानिमित्त दत्त मंदिर विकास नगर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या रक्तदान शिबिराचे उद्घाटन बागल गटाच्या स्वाभिमानी नेत्या सौ. रश्मी दिदी बागल, मार्गदर्शक विलासराव घुमरे सर यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाले. या रक्तदान शिबिरामध्ये 111रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की बागल गटाने कायम संघर्षातून यशस्वी वाटचाल केली आहे. आम्ही मामाच्या विचाराचा वारसा घेऊन कार्य करीत असुन बागल गटाचा निष्ठांवत कार्यकर्ता ही खरी बागल गटाची ताकद असुन कार्यकर्त्याच्या पाठबळावर यशस्वीपणे वाटचाल चालू आहे. दिग्विजय भेय्या बागल यांचा सत्कार करण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी तसेच लावंड फार्महाऊसवर दिवसभर कार्यकर्त्यांनी हजेरी लावून आपल्या लाडक्या युवा नेत्यांचा सत्कार केला.करमाळा तालुका पत्रकार संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला त्यामुळे यानिमित्ताने बागल गटामध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. यावेळी श्री. मकाईचे व्हाईस चेअरमन ॲड ज्ञानदेव देवकर, आजिनाथ कारखान्याचे चेअरमन धनंजय डोंगरे,माजी व्हाईस चेअरमन बाळासाहेब पांढरे, उपसभापती चिंतामणी दादा जगताप,मेजर ज्योतीराम लावंड,किसन शिंदे, पांगरेचे उपसरपंच सचिन पिसाळ, आदिनाथचे माजी संचालक ॲड दत्तात्रय सोनवणे, मकाईचे संचालक रामभाऊ हाके, महादेव गुंजाळ, गोकुळ नलवडे,बापु कदम, सौदागर दोंड, माजी सरपंच हरिश्चंद्र झिंजाडे, कृषी बाजार समिती संचालक देवा ढेरे, रंगनाथ शिंदे, शशिकांत केकान, अमोल झाकणे, डी ग्रुपचे अध्यक्ष विजय लावंड, नगरसेवक अल्ताफ तांबोळी ,मुकुंद कांबळे ,सचिन घोलप, कुमार माने, जयकुमार कांबळे अमोल यादव ,ज्योतीराम लावंड, पाराजी शिंदे नितीन खटके संजय चोपडे गुरूजी उपस्थित होते.रक्तदान शिबिराचे यशस्वीपणे आयोजन बागल गटाचे कार्यकर्ते धनंजय ढेरे रवीभाऊ शेळके यांनी केले होते.सालाबादप्रमाणे यावर्षीही लावंड वस्ती येथे माननीय दिग्विजय भैय्या बागल यांचा वाढदिवस लावंड परिवाराच्या वतीने साजरा करण्यात आला. लोकनेते स्व. मामानंतर ही दिग्विजय भैय्यांनी आपला वाढदिवस याच ठिकाणी साजरा करण्याची परंपरा ठेवली आहे. या वाढदिवसाच्या निमित्ताने समस्त मित्रपरिवार तालुक्यातील पदाधिकारी, करमाळा शहरातील नगरसेवक, अनेक गावांतील सरपंच, उपसरपंच, उपस्थित होते.
