भाऊ बहिणीचे अतुट नाते जपणाऱ्या राखी पोर्णिमा सणासाठी शुभम जनरल स्टोअर्समध्ये राखी घेण्यासाठी भगिनीची पंसदी
करमाळा प्रतिनिधी भाऊ बहिणीचे अतुट नाते जपणाऱ्या राखी पोर्णिमा सणासाठी करमााा शहरातील शुभम जनरल स्टोअर्समध्ये राखी घेण्यासाठी भगिनीची गर्दी केली होती. राखी पोर्णिमा या सणाच्या निम्मिताने राखी घेण्यासाठी करमाळा शहरातील शुभम जनरल स्टोअर्सचे गणेश राठोड दुर्गश राठोड यांनी भगिनी रास्त भावात रंगबेरंगी आकर्षक राख्या देण्याचे काम केले आहे .भारतीय संस्कृतीमध्ये सणांना फार महत्त्व आहे. एकत्र येऊन आनंदाने आणि उत्साहाने सण साजरे केल्याने नात्यांचे बंध आणखी दृढ होतात. असाच एक नात्यांचा बंध दृढ करणारा भाऊ-बहिणीसाठी खास असलेल्या या सणाला रक्षाबंधन असे म्हणतात. श्रावणी पोर्णिमेलाच हा सण साजरा केला जातो आणि ही परंपरा गेल्या कित्येक वर्षांपासून आपल्याकडे आहे. रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा सर्वात मोठा उत्सव मानला जातो. रक्षाबंधन दिवशी बहिणी त्यांच्या भावाच्या मनगटावर राखी बांधतात त्यासोबत त्यांच्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात आणि भाऊ आपल्या बहिणीला संरक्षण देण्याचे वचन देतो. भगिनींना राख्या योग्य भावात देऊन त्यांना मिळणारे समाधान हिच खरी आपली खरी कमाई असल्याचे राठोड बंधुनी सांगितले.
