Wednesday, April 23, 2025
Latest:
करमाळाक्रिडा

करमाळा तालुक्याचे सुपुत्र जलतरणपटू अर्जुन पुरस्कार. प्राप्त सुयश‌ जाधवचा मानवता फाउंडेशनच्या वतीने सत्कार

जेऊर प्रतिनिधी
पालकांनी मुलांना खेळ या विषयाकडे सकारात्मक दृष्टीने बघायला शिकवणे गरजेचे असून करमाळा तालुक्यात क्रीडा प्रबोधनी सुरू करण्याचा मानस असल्याची प्रतिक्रिया पांगरे येथील आणि अर्जून पुरस्कार प्राप्त जलतरणपटू सुयश जाधव यांनी दिली.करमाळा तालुक्यातील मानवता फाउंडेशनला आज जलतरणपटू सुयश जाधव यांनी भेट दिली त्यावेळी ते बोलत होते .पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, माझ्या यशात आई वडील यांचा मोलाचा वाटा आहे.अर्जुन पुरस्काराने सन्मानित झालो ते यश आई वडील यांच्या पाठींब्यामुळेच प्राप्त झाले असल्याचे यावेळी सांगितले. मानवता फाउंडेशनच्या अनौपचारिक संवाद व सुयश जाधव यांचा हृदय सत्कार तहसीलदार समीर माने, मंडल अधिकारी संतोष गोसावी यांच्या. प्रमुख उपस्थिती मध्ये जेऊरच्या स्वामी विवेकानंद सभागृहात मध्ये पार पडला. यावेळी मानवता फाऊंडेशनचेउमेश पाथ्रुडकर, नागेश झांझुर्णे, संदीप कोठारी, महेश रणदिवे, दीपक चव्हाण, सुजितकुमार दोंड, गजेंद्र पोळ, राहुल लोंढे, कैलास काकडे, परमेश्वर पाटील, निकील मोरे, प्रशांत नाईकनवरे, गणेश मोरे, राजेंद्र खाडे, दत्ता पवार, सचिन सरगुले, मंगेश देवकर, अमित संचेती, महादेव कुंभार अतुल घोगरे आदी उपस्थित होते.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group