कुरेशी समाजातील जेष्ठ नागरिक मंजूरअहमद कुरेशी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
करमाळा प्रतिनिधी
करमाळा शहरातील कुरेशी गल्ली येथील ज्येष्ठ नागरिक मंजूरअहमद अब्दुल रहीम कुरेशी वय 65 यांचे आज शुक्रवारी रोजी हृदयविकाराच्या झटक्याने दुपारी सव्वा एक वाजता निधन झाले.त्यांच्या पश्चात दोन मुले दोन मुली सुना, नातवंडे पणतु असा परिवार आहे त्यांच्या अकस्मात निधनाने हळहळ व्यक्त होत आहे मंजूरअहमद कुरेशी हे मनमिळावू व धार्मिक स्वभावाचे होते त्यांची अंत्ययात्रा रात्री ईशा नमाज नंतर त्यांच्या राहत्या घरापासून निघणार आहेमंजूरअहमद कुरेशी हे माजी नगरसेवक नजीर अहमद कुरेशी यांचे बंधू होत
