करमाळाराजकीय

राज्यातील सत्तांतराच्या पार्श्वभूमीवर शंभूराजे जगताप यांनी घेतली प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांची भेट – करमाळ्यात चर्चेला उधाण…

 

करमाळा  प्रतिनिधी :

करमाळा प्रतिनिधी महाराष्ट्र राज्यातील सत्तांतराच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे युवा नेते शंभूराजे जगताप यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची मुंबई येथे जावून भेट घेतली, या भेटीनंतर मात्र करमाळा तालुक्यात चर्चेला उधाण आले आहे.या भेटीत शंभूराजे जगताप व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यात करमाळा तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यातील राजकिय व इतर विविध विषयांवर प्रदीर्घ चर्चा झाली, शंभूराजेंनी करमाळा तालुक्यात राबवलेल्या विविध सामाजिक उपक्रमाबद्दल माहिती दिली व दादही मिळवली. विशेषतः कोरोना काळात संपूर्ण तालुक्यात कोविड नियंत्रणासाठी केलेल्या उपाययोजना यामध्ये तब्बल ३५,००० मास्क ,सॅनेटायझर चे वाटप ,हजारो नागरिकांचे थर्मल स्क्रीनिंग,नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंसह किराणा किटचे वाटप या उल्लेखनीय कामांबाबत चंद्रकांत पाटील यांनी विशेष कौतुक केले.नुकतेच शंभूराजेंनी संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील सर्वात मोठ्या योग दिनाचे आयोजन करुन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे योगा बद्दलचे विचार हजारो नागरिकांपर्यंत पोहचवले आहेतसेच आषाढी एकादशीनिमित्त करमाळा शहरातून हजारो विद्यार्थ्यांची सामूहिक दिंडी काढून या माध्यमातून पर्यावरण संवर्धन,साक्षरता,स्वच्छता या सामाजिक विषयांवर नागरिकांचे प्रबोधन केले होते या उपक्रमाचे देखील सर्वांनी कौतुक केले.शंभूराजे जगताप हे करमाळा तालुक्यातील जनतेशी सातत्याने संपर्कात राहून त्यांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात. शंभूराजे जगताप २०१९ च्या लोकसभेपासून बीजेपी चे प्रामाणिकपणे काम करत आले आहेत याचा देखील उल्लेख चंद्रकांत दादांनी केला. शंभूराजे जगताप यांच्या कामाच्या पद्धतीमुळे त्यांची नवीन युवा पिढीमध्ये मोठ्या प्रमाणावर लोकप्रियता दिसून येते.महाराष्ट्राच्या राजकारणाची सत्ता पालट झाली त्याच्या अगोदर पासून शंभुराजे जगताप यांचा बीजेपीच्या मोठ्या नेत्यांशी कायम संपर्क आहे त्यामुळे तालुक्याच्या राजकारणात नवनवीन चर्चेला उधाण आले आहे.

 

error: Don\'t try to copy. Content is protected !!