करमाळा तालुक्याचे सुपुत्र ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक कै,पै राजाराम (बापू) जाधव भारत देशातील एक महान मल्ल कुस्ती सम्राट होऊन गेले त्यांच्या बद्दल थोडं
करमाळा तालुक्यातील एक छोटसं झरे गाव या गावात 1947 देश स्वातंत्र्य होण्याअगोदर एक महान कुस्ती सम्राट होऊन गेले त्यांचे नाव *पैलवान राजाराम (बापू) जाधव* स्वातंत्र्य च्या अगोदर आपल्या देशात हिंदकेसरी महाराष्ट्र केसरी अशा पदव्या नव्हत्या परंतु सध्या ज्या प्रकारे एखाद्या खेळाडूला देशासाठी चांगली कामगिरी केली की पोलीस दलात अथवा सैन्यदलात भरती देऊन सन्मान केला जातो, त्याचप्रमाणे त्या वेळच्या शासनाने *राजाराम (बापूंची) सैन्यदलात पोस्टिंग करून त्यांचा योग्य तो सन्मान केला होता* आणि त्यांनी देशाची उत्कृष्टरित्या सेवा करत समाजापुढे एक वेगळा आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्यांच्या पश्चात त्यांचे चिरंजीव शेटीबा जाधव हे सुद्धा एक उत्कृष्ट पैलवान होते या आठवणीला उजाळा देण्याचे कारण म्हणजे *कै.शेटीबा जाधव यांचे चौथे पुण्यस्मरण..*
खरं तर करमाळा तालुक्याची शान असणारे राजाराम (बापू) जाधव हे काळाच्या ओघात तालुक्यातील नेते मंडळी कडून दुर्लक्षित होत गेले त्यांचा इतिहास बघितला तर तालुक्याचं नाव त्यांनी संपूर्ण देशभरात गाजवलं होतं अशा व्यक्तीच्या कुटुंबासाठी तालुक्यातील नेतेमंडळी ची सदभावना असणे गरजेचे असते परंतु सध्या ज्या प्रकारची राजकीय व्यवस्था आहे त्यात अशा महान व्यक्तीला विसरणे म्हणजे आताच्या राजकीय पुढाऱ्यांना ते सहज शक्य आहे.
पण कैलास वासी पैलवान राजाराम(बापू) यांच्या नंतर त्यांचे चिरंजीव शेटीबा जाधव यांनी सुद्धा कुस्तीचा वारसा पुढे चालवला समाजकारणात सुद्धा राजाराम बापूंनी स्वतःचे योगदान दिले,आणि आत्ता बापूंचे नातू सोमनाथ जाधव हे सुद्धा सध्या महाराष्ट्रभर समाजकारणाच्या मशाल घेऊन फिरत आहेत बच्चू (भाऊ) कडू यांच्या प्रहार संघटनेमध्ये सामील होऊन त्यांच्या खांद्याला खांदा लावून समाजातील दुर्लक्षित घटकांसाठी झटत आहेत.
म्हणून तालुक्यातील सर्व जनतेने राजाराम(बापू) सारख्या तालुक्याच्या सुपुत्राला पुन्हा एकदा उजेडात आणून *सोमनाथ जाधव* जे प्रहार चे तालुका उपाध्यक्ष म्हणून सध्या कार्यरत आहेत समाजसेवा करत आहेत त्यांच्यासोबत ताकतीने उभे रहाने गरजेचे आहे.
पुन्हा एकदा सर्व तालुक्याच्या वतीने *कै.पै.राजाराम (बापू) कै.शेटीबा जाधव यांच्या स्मृतीस वंदन.*
